Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

विद्यार्थ्यांना दिलासा

Share
मुंबई । वृत्तसंस्था :  वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणाच्या मुद्यावरुन आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने काहीसा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या निवडीसाठी देण्यात आलेली मुदत एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या बैठकीला भाजपाचे आमदार प्रवीण दरेकरदेखील उपस्थित होते.

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. मात्र यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने ही मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची निवड करण्यासाठी अजून एक आठवडा मिळाला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी येत आहेत.

या अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात, यासाठी विद्यार्थी आठवड्याभरापासून आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत.
आज संध्याकाळी गिरीश महाजन यांनी आझाद मैदानातल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री स्वत: या प्रकरणात लक्ष घालत असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. महाविद्यालयाची निवड करण्यासाठी आलेली मुदत वाढवून देण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

त्यानुसार महाविद्यालयाच्या निवडीसाठी आठवड्याभराची मुदतवाढ देण्यात आली. या प्रकरणी अध्यादेश आणण्याचा विचार फडणवीस सरकारकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र आचारसंहिता सुरू असल्यानं त्यात अडथळे येत आहेत.

[button color=”” size=”” type=”round” target=”” link=””]

अध्यादेशाची तयारी सुरु

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसनंतर मनसेनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी आणि मनसेने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याने राज्य सरकारने आंदोलन मिटवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. सरकारकडून याबाबत अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती गिरीश महाजनांनी विद्यार्थ्यांना दिली.

[/button]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!