ऐनपूर येथे दारुबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’

0

ऐनपूर, ता.रावेर । दि.5 । वार्ताहर-ऐनपुर येथे संपुर्ण दारुबंदी व्हावी यासाठी येथिल मातोश्री रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व ग्रामस्थ महिला यांनी दिलेले निवेदन व ग्रामसभेचा ठराव तसेच महिलांच्या ओळख पडताळणी नंतर मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशानुसार सदर दारुबंदीसाठी महिला मतदान घेण्याचे ठरुन मा.तहसिलदार रावेर यांनी याबाबत दि.11 ऑगष्ट रोजी मतदान घेण्यात येईल असे आदेश दिले.

त्यानुसार दि.4 ऑगष्ट रोजी सायंकाळी बसस्टॅन्ड वरील मातोश्री रमाबाई आंबेडकर संस्थेच्या फलकास व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन संस्थेच्या अध्यक्षा सौ.आशा चंद्रगुप्त भालेराव यांनी प्रचाराचा नारळ फोडला.

यावेळी संस्थेच्या संचालक महिलांसह ग्रामस्थ महिला व पुरुष यांची तोबा गर्दी या प्रचार रॅलीत पाहायला मिळाली. तसेच युवा वर्गानेही या प्रचार रॅलीत पहायला मिळाली.

तसेच युवा वर्गानेही या प्रचार रॅलीत उस्फुर्त सहभाग नोंदविला. दारुबंदी झालीच पाहीजे, बाटली आडवी झालीच पाहिजे या घोषणांनी सारे गाव दुमदुमून गेले होते.

प्रचार रॅलीत 1500च्या वर महिला उपस्थित होत्या तसेच पुरुष व युवावर्गाचा सुध्दा चांगला प्रतिसाद लाभला. सदर दारुबंदी साठी दि.11 ऑगष्ट 2017 रोजी मतदान होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*