Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

आता म्हणतात हॅकर खोटे, मग मला वेगळा न्याय का?

Share

फैजपूर, ता.यावल ।  वार्ताहर :  भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीन हॅक केल्याच्या माहितीमुळे झाली असल्याचे एका हॅकरने म्हटले आहे. हॅकर हे खोटारडे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे आता पक्षाने सांगितले. हॅकर मनीष भंगाळे याने माझ्यावर दाऊद सोबत संभाषण असल्याचे सांगितले होते. मग त्याच्यावर का विश्वास ठेवण्यात आला? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांनी फ़ैज़पूर येथे पत्रकार संघाचे वातानुकूलित कार्यालय उद्घाटनप्रसंगी उपस्थित केला.

आ.खडसे व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्यात दूरध्वनीद्वारे संभाषण झाल्याचा व त्याचे कॉल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनिष भंगाळे याने केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाअंती खडसे यांना क्लीनचीटही दिली. आ.खडसे म्हणाले की, त्याने माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले? त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते, अशी खंत देखील आ. खडसे यांनी व्यक्त केली.

फैजपूर पत्रकार संघ व खान्देश नारी शक्ती यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाचे उदघाटन प्रजासत्ताक दिनी माजीमंत्री एकनाथराव खडसे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रात उलेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तीचा व ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, लाला कोष्टी, उमाकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी आ.खडसे तर प्रमुख अतिथी म्हणून स्वामीनारायण गुरुकुल संस्थेचे उपाध्यक्ष शास्त्रीभक्तीकिशोर दासजी महाराज, आ.हरिभाऊ जावळे, माजी आ.शिरीष चौधरी, नगराध्यक्षा महानंदा होले, म.स.सा.का. चेअरमन शरद महाजन, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, स.पो.नि दत्तात्रय निकम, उपनगराध्यक्ष कलिम मणियार, जिल्हा दुध संघ संचालक हेमराज चौधरी, भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, राष्ट्रवादी गटनेता शेख कुर्बान, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, निलेश राणे, म.सा.का संचालक नरेंद्र नारखेडे, शुभम टेक्सटाईल चे सुनील वाढे, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, अमोल निंबाळे, रशीद तडवी, हिरालाल चौधरी, डॉ इम्रान अब्दुल राउफ, माजी नगरसेवक शेख जफर, दीपाली झोपे यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फारूक शेख, उपाध्यक्ष योगेश सोनवणे, सचिव शाम पाटील, अरुण होले, नंदकिशोर अग्रवाल, समीर तडवी, कृष्णा पाटील, इंदू पिंजारी, वासुदेव सरोदे, सलिम पिंजारी, मयूर मेढे, राजू तडवी, उमाकांत पाटील, प्रा.राजू तायडे, संजय सराफ, कामींल, मुबारक तडवी, मोईद्दीन शैख यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र राजपूत, प्रा.राजू पटेल, मुख्याध्यापक गणेश गुरव यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या नवरत्नांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांना गुरु गौरव पुरस्कार, प्रतिभा तुकाराम बोरोले शिक्षण मित्र पुरस्कार, नरेंद्र नारखेडे सहकार भूषण पुरस्कार, डॉ अभिजीत सरोदे धन्वंतरी पुरस्कार, डॉ उमेश चौधरी संजीवनी पुरस्कार, युगंधर पवार युवा उद्योजक पुरस्कार, चंद्रशेखर अग्रवाल युवा उद्योजक पुरस्कार, राजू तडवी वास्तुरत्न पुरस्कार, नितिन कुरकुरे उद्योगरत्न पुरस्कार सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल देऊन गौरवण्यात आले. प्रास्ताविक वासुदेव सरोदे तर आभार प्रा.उमाकांत पाटील यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!