मुंबईत 9 रोजी मराठा क्रांती महामोर्चा : जिल्ह्यातील 1 लाख समाजबांधव सहभागी होणार

0
जळगाव । दि.5 । प्रतिनिधी-कोपर्डीतील लेकीवर अत्याचारानंतर न्याय मिळण्यास होत असलेली दिरंगाई, मराठा समाज आरक्षण, शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव मिळावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे दि.9 रोजी मुंबईत महामोर्चा होणार आहे.
या महामोर्चाला जिल्ह्यातील जवळपास 1 लाख समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती प्रा.डी.डी. बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई येथे होणार्‍या महामोर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. याबाबत बैठक घेवून सर्वांना सूचना दिलेल्या आहेत.

महामोर्चासाठी राज्यासह इतर राज्यातूनही जवळपास दीड कोटी समाजबांधव सहभागी होणार असून जिल्ह्यातील 1 लाख समाजाबांधव सहभागी होणार आहेत.

हा महामोर्चा शिस्तीचा आणि शांततेचा ठरणार आहे. दि.9 रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील जिजामाता उद्यान, भायखेळा येथून सुरुवात होऊन आझाद मैदानावर समारोप होईल.

मोर्चात सहभागी होण्यासाठी खाजगी बस, रेल्वेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, यासाठी समाजबांधवांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेस अ‍ॅड.रविंद्र पाटील, डी.जी. पाटील, माजी आ.दिलीप वाघ, माजी कैलास पाटील, संजय पवार, अ‍ॅड.विजय पाटील, हेमंत साळुंखे, भीमराव मराठे, अ‍ॅड.भरत देशमुख, ईश्वर रहाणे, यु.डी. पाटील, सुलोचना वाघ, मंगला पाटील, तिलोत्तमा पाटील, अ‍ॅड.ललीता पाटील, विनोद देशमुख, योगेश पाटील, राजेश पाटील, दीपक सूर्यवंशी, विकास नरवाडे, राम पवार, सचिन सोमवंशी, विलास पाटील, अजित पाटील, महेश सुर्यवंशी, प्रा.सुनील गरुड, राजेंद्र चौधरी, निवृत्ती पाटील आदी समाजबांधव उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*