पिंप्राळा हुडकोत 144 घरकुलांचे काम अपूर्ण

0
जळगाव । दि.5 । प्रतिनिधी-पिंप्राळा हुडको येथे एकात्मिक झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत 472 घरकूलांसाठी योजना राबविण्यात आली आहे.
त्यानुसार आतापर्यंत केवळ 252 घरकूलांचे काम पूर्ण झाले आहे. मुदत संपुनही उर्वरित 144 घरकूलांचे काम सुरु झाले नसल्याने ही योजना पंतप्रधान आवास योजनेत वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान मनपा प्रशासनाने डीपीआर तयार केला आहे.

पिंप्राळा हुडको परिसरात सुरु असलेल्या या कामांची पाहणी उपायुक्त चंद्रकांत खोसे, शहर अभियंता सुनिल भोळे यांनी केली.

पिंप्राळा शिवारतील गट न. 214 येथे भाग 1 वर घरकुल योजनेला दि. 15 जानेवरी 2013 रोजी या कामास सुरुवात करण्यात आली.

योजनेतंर्गत 472 घरकुलांचे कामांचा प्रस्ताव होता. पहिल्या टप्प्यात 328 घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. यातील 252 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.

केवळ रंगकाम, पाण्याची टाकी व वीजपुरवठा ही कामे बाकी आहेत. पूर्ण झालेले घरकूल महिनाअखेर लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.

उर्वरित 144 घरकूलांचे काम सुरु झाले नसल्याने ही योजना पंतप्रधान आवास योजनेत वर्ग करण्यात आली आहे. त्यासाठी नवीन डीपीआर तयार करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुनील भोळे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*