आयएमएच्या अ‍ॅम्सकॉन परिषदेत उपचार पध्दतींवर मंथन

0
जळगाव । दि.5 । प्रतिनिधी-इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅम्सकॉन 2017 या अ‍ॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या राज्यस्तरीय परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान यावर मंथन सुरु झाले आहे.
शहरातील हॉटेल कमल पॅरॉडाईज येथे आयएमए तर्फे आयोजित अ‍ॅम्सकॉन 2017 या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेला आजपासून सुरुवात झाली आहे.

या परिषदेचे उद्घाटन नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवि वानखेडकर यांच्याहस्ते झाले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन सोबत आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, कोषाध्यक्ष डॉ. पार्थिव संघवी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वेश अग्रवाल, सचिव डॉ. राजेश पाटील, सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. राज नगरकर, डॉ. एन.एस. आर्वीकर यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर उपस्थित होते. या परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थित झाले आहेत.

LEAVE A REPLY

*