Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

सहावा टप्पा : दिल्लीसह 59 ठिकाणी आज मतदान

Share
नवीदिल्ली । वृत्तसंस्था :  लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील 59 मतदारसंघात दि. 12 रोजी मतदान होणार आहे. काँग—ेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा, विजेंदर सिंह, तसेच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी, गायक हंसराज हंस, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपच्या आतिशी, राघव छड्डा आदी उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे.

सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, हरयाणातील 10, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, जागांसाठी मतदान होणार आहे. तर दिल्लीतील 7 व झारखंडमधील 4 जागांसाठी मतदान होणार आहे. जवळपास 10 कोटी 18 लाख मतदार आपला हक्क बजावू शकतील. या 59 मतदारसंघांमध्ये 979 उमेदवार आहे. एकूण 1 लाख 13 हजार 167 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात हरयाणा व दिल्लीतील सर्व मतदारसंघांत मतदान पूर्ण होईल. या टप्प्यात दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप व काँग—ेस यांच्यात कमालीची चुरस असून, हरयाणामध्येही भाजप, काँग—ेस व लोक दलाचे दोन गट यांच्यात प्रामुख्याने लढती पाहायला मिळतील.

बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पार्टी यांची युती आणि त्या विरोधात काँग—ेस-राष्ट्रीय जनता दल यांच्यात लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, माकप व भाजप अशा तिरंगी लढती होणार आहेत.
पाच टप्प्यातील निवडणुका संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दोन टप्प्यांसाठी आपले वर्चस्व पणाला लावले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!