नेट परिक्षेसाठी ही लागणार ‘ आधार’

0
जळगाव | प्रतिनिधी : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील व्याख्याता पदासाठी घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्थात नेट परिक्षेसाठीही आता आधार क्रमांकाची सक्ती करण्यात आली आहे.
नेट परिक्षेसाठीचे नोटीफिकेशन काढण्यात आले आहे. ११ ऑगस्टपासून या परिक्षेसाठी अर्ज भरणे सुरू होणार आहे. ११ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत हे अर्ज भरता येणार आहेत.
त्याचे परिक्षा शुल्क १२ सप्टेंबरपर्यंत भरता येईल. परिक्षा ५ नोव्हेंबरला होईल. हा अर्ज भरतांना त्यांता आधार कार्डाचा क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

*