विघ्नसंतोषींवर प्रतिबंधात्मक कारवाई : अप्पर अधीक्षक बच्चनसिंग यांची माहिती

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  आगामी गणेशोत्स, बकरी ईद यासह विविध उत्सवांमध्ये पोेलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाईवर जोर देण्यात येणार आहे. शहरातील काही जणांवर गणेशोत्सावापूर्वीच एमपीडीए, ५६, ५७ ची कारवाई करण्यात येणार यासाठीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाविण्यात आले आहे.

आगामी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी भुसावळ विभागातील अधिकार्‍यांना महत्वपूर्ण सुचना देण्यात आल्या. आहे. पेट्रोलिंग कर्मचार्‍यांवर अत्याधुुनिक पद्धतीने लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते.

येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात उत्सावांसंबंधी पोलिसअधिकारी यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ही माहिती दिली.

एमपीडीएच्या कार्रवाईच्या प्रस्तावात शहरातील लोकांची संख्या अधिक आहे. विविध गुन्ह्यांमधील आरोपींची ओळखपरेड करुन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात खर्‍या गुन्ह्यांचा व कुणावर अन्याय होणार नाही याबाबत अधिकार्‍यांना सुचनाही देण्यात आल्याचे बच्चनसिंग यांनी सांगितले. अवैध शस्त्र बाळगणार्‍यांवरही कारवाईची मोहिम सुरुच असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्सावांदरम्यान संपूर्ण गुन्हे कव्हर व्हावे. ग्रामीण भागात व शहरात कॉर्नर मिटींगवर जोर देण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी प्रभारी अधिकारी तर अतिसंवेदनशील ठिकाणी सहाययक पोलिस अधिक्षक लक्ष घालणार आहेेत. यासाठी रुट मार्चही काण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिणा भरात नवीन उपविभागीय कार्यालया व तालुका पोलिस स्थानकानचे नवीन जागेत स्थलांतरासाठी प्रयत्न सुरु आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करणार सल्याचे ही त्यानी सांगितले.

सीटीझन पोर्टल

पोलिस विभागातर्फे सर्वसागान्या नागरिकांच्या सोयीसाठी ‘सिटीझन पोर्टल’ सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे नागरिकांना आपला लॉगीन आयडी तयार करुन संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदविता येवू शकणार आहे. शिवाय पोलिस स्थानकांनिहाय तक्रारी, गुन्ह्यांचा तपशीलही बघता येणार आहे. या पोर्टलवर बलात्कार, अल्पवयिन लैंगिक छळ, संविधानाविरुद्ध, दोन जातीमंधील दंगली, वाद या गुन्ह्यांचा तपशील नसेल.

पेट्रोलिंगवर आरएफआयडीची नजर

कर्मचार्‍यांच्या रात्रीच्या पेट्रोलिंगवर लक्ष ठेवण्यासाठी रेडीओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन (आरएमआयडी) यंत्रणा लवकरच पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून हा उपक्रम लवकरच शहरातही राबविण्यात येइल.पेट्रोलिंग पॉइंटवर ५ मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे पेट्रोलिंगवरही प्रशासनाला नजर ठेवता येणार आहे.जनसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ही मशीनचा गुड मॉर्निंग व निर्भया पथकांनाही उपयोग होणार आहे. यासाठी स्वतंत्र चीप असेल

ऍन्टी रोमियो स्क्वॉड

उत्सवांमध्ये होणार्‍या युवती व महिलांच्या छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी ऍन्टी रोमियो स्क्वॉड तयार करण्यात येणार आहे. यात २ महिला कर्मचारी, ४ पुरुष कर्मचारी, १०-१५ स्वयंसेवकांचा सामवेश असणार आहे. यात महिला सशक्तीकरणासाठी काम करणार्‍या स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षण व टीशर्ट देेण्यात येणार आहे. हे पथक एपीआय खैरनार यांच्या मार्गदर्शनाखली काम करेल.

LEAVE A REPLY

*