चिनी मालावर बहिष्कार टाका : जलसंपदा मंत्री ना. महाजन

0

जळगाव | प्रतिनिधी : भारतावर नेहमी विखारी डंख मारणार्‍या चिन देशाला धडा शिकवण्यासाठी सर्व प्रकारच्या चिन उत्पादीत मालावर बहिष्कार टाकावा. चिनने उत्पादीत केलेल्या मालाची खरेदी विक्री करू नये असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले आहे.

श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे चिनी मालावर बहिष्कार टाकण्याबाबतच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

येथील  आर.आर. शाळेसह शहरातील विविध शांळांचे विद्यार्थी, शिक्षकही यात सहभागी झाले होते.  विद्यार्थ्यांना चिनी मालाची खरेदी न करण्याबाबतची शपथ देण्यात आली.यावेळी भरत अमळकर, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह आर.आर.शाळेचे मुुख्याध्यापक शिक्षक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*