खान्देश कन्यांनी न्यूयॉर्कमध्ये जागविला राष्ट्राभिमान

0
चोपडा |  प्रतिनिधी :  न्यूयॉर्क येथे १९ रोजी ७२ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन’ ( fia ) द्वारा आयोजित इंडिया परेड या जगात सर्वात मोठी मानल्या जाणाऱ्या रॅलीत भारतातील विविध राज्यातून वेगवेगळ्या उद्देशाने अमेरिकेत गेलेल्या भारतीय बांधवांनी फार मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यात महाराष्ट्रातील जल्लोष गृपने देखील सहभाग घेतला होता.या गृप मध्ये शितल महाजन चोपडा ( प्रताप विद्याल्याची माजी विद्यार्थिनी ) रंजीता वानखेडे जळगाव,परेश पवार धुळे यांनीही सहभाग घेऊन स्वदेशाभिमान व्यक्त केला.

न्यूयॉर्क, न्युजर्सी, कनेक्टिकट स्टेटस मिळून, इंडिया परेडचे, आयोजन FIA गेल्या ३८ वर्षांपासून करीत आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन कन्या श्रुति हसन,अभिनेता अनुपम खेर, सुप्रसिद्ध गायक कैलास खेर, आदी दिगग्ज अतिथी म्हणून उपस्थित होते.

१९ रोजी न्यूयॉर्क येथे ३८ स्ट्रीट मॅडिसन अव्हेन्यू येथून रॅलीची सुरवात होऊन सांगता २३ स्ट्रीट मॅडिसन अव्हेन्यू येथे झाली. या रॅलीत दीड लाख भारत प्रेमींनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील जल्लोष गृप रॅलीत चित्तवेधक ठरला. रॅलीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, स्वदेशाभिमान व एकतेचे दर्शन घडविले.मोठ्या उत्साहात जल्लोषात विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

श्रुती हसन यांच्या सहभागाने , कैलास खेर यांच्या गायनाने कार्यक्रम उच्च शिखरावर पोहचला. सदर कर्यक्रमात मिळालेला निधी नैसर्गिक अपत्तीग्रस्त केरळ मधील बांधवांसाठी देणार असल्याचे मनोदय जल्लोष गृपने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*