फ्रेंडशीप-डे’साठी तरुणाई सज्ज

0

जळगाव |  प्रतिनिधी  :  आई – वडील, बहिण भावाच्या अतुट नात्यासह मैत्रीचे नाते हे अधिक घट्ट असते. हे नाते कायम स्वरुपी घट्ट रहावे यासाठी त्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सर्वत्र फ्रेंडशीप डे साजरा केला जात असतो. हा दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.

तरुणाई कडून हा दिवस एकमेकांना भेटवस्तू देवून साजरा उत्साहात साजरा केला जात असतो. दरम्यान भेटवस्तू खरेदीसाठी शहरातील गिफ्ट शॉपमध्ये तरुणाची लगबग दिसून येत आहे.

बहिण भावाचे नाते कायम अटूत रहावे यासाठी ज्याप्रमाणे भाऊ बहिण रक्षाबंधनाची आतूरतेने वाट बघत असते. त्याप्रमाणे मित्र मैत्रीणींमध्ये असलेले मैत्रीचे नाते नेहमी घट्ट रहावे यासाठी महाविद्यालयीन तरुणांकडून फेंडशिप डे ची अतुरतेने वाट बघत असते.

फ्रेंडशीप डे हा दिवस येत्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई कडून एकमेकांना फें्रडशिप बँड बांधून व भेटवस्तू देवून साजरा केला असतो. फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी तरुणाईची लगबग सुरु झाली असून शहरातील गिफ्टशॉप मध्ये काही प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

यामध्ये तरुणाई कडून फे्रंडशिप बॉक्स, लिटील बॉक्स टेडी, स्माईली किचन, ग्रिटींच कार्ड, एलईडी फ्रेंडशिप ग्लास, स्लोगन बॉटल, मैत्रीचा संदेश लिहीलेले काचेचे बल्ब यासह विविध प्रकारचे संदेश लिहीलेले कार्ड बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.

ग्रुपफोटो  फ्रेमला अधिक पसंती

फेंडशिप डे निमीत्त मित्र आपल्या ग्रुपमधील आपल्या मित्रांना भेट वस्तू देवून साजरा करीत असतो. सर्व मित्रांची आठवण रहावे यासाठी बाजारात ग्रुपफोटो फ्रेम विक्रीसाठी आली आहे.

यामध्ये ग्रुपमधील सात ते आठ जणांचे फोटो लावता येवू शकता. यामध्ये विविध प्रकारचे डिझाईन असून या फ्रेम तरुणांना आकर्षीत करीत असल्याने महाविद्यालयीन तरुणांकडून या फ्रेमला अधिक पसंती दिली जात आहे.

स्क्रोलचे आकर्षण

पुर्वी मैत्रीचा संदेश देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीटींग कार्डचा वापर केला जायचा. परंतू बदलत्या काळानुसार हे ग्रीटींग कार्ड लुप्त होत असून त्याऐवजी म्युझिकल ग्रीटींग व स्क्रोल खरेदी केले जात आहे.

तसेच कापडी लखोट्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे मैत्रीचे संदेश लिहीलेल्या कापडी लाखोट्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

या वस्तुंना अधिक मागणी

फ्रेंडशीप डे निमीत्त मित्रांना भेटवस्तू देवून साजरा केला जात असतो. यामध्ये स्लोगन लिहीलेला लाईट लँम्प, गिफ्टकार्ड बॉक्स, फ्रेंडशीप कार्ड बॉक्स, डायरी -पेन- किचन चा सेट, चॉकलेट बॉक्स, ग्रिटींग्ज कार्ड, संदेश लिहीलेल्या काचेच्या वेगवेगळ्या बॉटल्स, ग्लो, कार्टुन व मेटलचे फ्रेंेडशिप बँड, कपल किचन यासह स्वत: तयार करुन भेटवस्तू देण्यासाठी ड्रॉईंग्जच्या साहित्याला महाविद्यालयीन तरुणांकडून अधिक मागणी होत आहे. या वस्तू ५ रु ते ६०० रुपयांपर्यत त्यांची कींमत असून तरुणाईकडून या वस्तूंची खरेदी केली जात आहे.

गिफ्टशॉपवर गर्दी

आपल्या मित्राला भेटवस्तू देण्यासाठी व फ्रेंडशिप बँड खरेदी करण्यासाठी शहरातील महाविद्यालयीन परिसरात असलेल्या गिफ्टशॉपवर महाविद्यालयीन तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तसेच विविध ठिकाणी फ्रेंडशिप बँडचे दुकाने विक्रेत्यांकडून थाटण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.

ग्राहकांकडून भेटवस्तूंची मागणी अधिक प्रमाणात होत असते. त्यानुसार आम्ही नवीन वस्तू देण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदा भेटवस्तूंच्या भावात कोणतीही भाववाढ झालेली नाही. तसेच जीएसटीचा यावर कोणताही परिणाम झालेला नाही.
– दिलीपकुमार देशपांडे
संचालक, गणेश एम्पोरियम

LEAVE A REPLY

*