अमळनेर तालुक्यातील जलयुक्त शिवार कामांची चौकशी

0

अमळनेर |  प्रतिनिधी :  तालुक्यात जलयुक्त शिवार २०१६/१७ अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदारांची देयके अदा करू नयेत, अशी मागणी विधान परिषदेच्या सदस्या आ. स्मिता वाघ यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. पांडुरंग ङ्गुंडकर यांचेकडे केली. यावर मंत्र्यांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषि विभागास दिले आहेत.

या संदर्भात दिलेल्या पत्रात आ. स्मिता वाघ यांनी म्हटले आहे, की कृषी विभागामार्ङ्गत जलयुक्त शिवार अभियान २०१६/१७ अंतर्गत दहिवद, लोणचारम, सडावण एकूण १२ गट नांदगाव, गलवाडे, कुर्हे बु, एकूण २० गट, सारबेटे, टाकरखेडे, एकूण २२ गट, आदी ठिकाणी राबविण्यात आलेल्या नालाखोलीकरण व सिमेंट बंधारे इत्यादी कामात प्रचंड अनियमितता आढळून आली.

या ठिकाणच्या लाभ क्षेत्रातील लोकांच्या तक्रारी प्राप्त आहेत. यामुळे कामाचा दर्जा तसेच इतर गुणवत्तेबाबत त्वरित चौकशी करून त्याबाबतचा अहवाल अवगत करण्यात यावा व तो पर्यंत देयके अदा करू नयेत, अशी मागणी सौ वाघ यांनी केली.

अमळनेरसह इतर तालुक्यात जलयुक्त शिवार कामे सुरू कारण्याबाबत तारांकित प्रश्न-जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, यावल, चाळीसगाव आदी तालुक्यात जलयुक्त शिवार कामे सुरू करण्याबाबत आ.स्मिता वाघ यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सकारात्मक उत्तर देऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले.

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी जलयुक्त शिवार कामांतर्गत २३२गावांमध्ये कामे झाल्याने ३० हजार टी एम सी जलसाठा निर्माण होऊन भूजल पातळी दीड मीटरने वाढली. यामुळे यामुळे हजारो हेक्टर जमिनीला लाभ झाला.

मात्र यावर्षी अमळनेरसह विविध तालुक्यात जलयुक्तची कामे सुरू न झाल्याने तसेच वर्क ऑर्डर हि झालेली नसल्याने कामे कधी पूर्ण होणार आणि पाणी कधी साचणार याबाबत शेतकर्‍यांमध्ये शंका निर्माण झाली असल्याचा मुद्दा आ वाघ यांनी या प्रश्नात उपस्थित केला. यावर मंत्र्यानी सकारात्मक उत्तर दिले.

आदिवासी भागात आरोग्य विभागातील पदे भरण्याबाबत तारांकित प्रश्‍न

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य विभागात ३५० पदे रिक्त असून ही पदे तात्काळ भरण्याचे आदेश देऊनही भरली जात नाहीत,याप्रकरणी चौकशी करून पदे भारण्याबत कोणती कार्यवाही केली? याबत तारांकित प्रश्न आ स्मिता वाघ यांनी अधिवेशनात उपस्थित केला.

यावर सार्व. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी खुलासा करून पदे भारण्याबत कार्यवाहि सुरु असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*