सरकार काय लपवतेय : आ.एकनाथराव खडसे विधानसभेत कडाडले

0
मुंबई |  प्रतिनिधी :   एमआयडीसीने किती भूखंड परत केले, याची माहिती मागील अधिवेशनापासून मी मागत आहे. सहा-सहा महिने याची माहिती दिली जात नाही. सरकारचं नेमके काय चाललंय. माहिती का दडवली जात आहे. सरकार काय लपवतेय, असा सवाल माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित करीत सरकारलाच धारेवर धरले.

विरोधी पक्षनेतेपदी असताना आघाडी सरकारच्या मंत्र्यांना धारेवर धरणार्‍या खडसे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. खडसेंच्या समर्थनार्थ विरोधी आमदारांनी घोषणाबाजी करत सरकारला अडचणीत आण्याचे काम केले.

प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून झालेल्या गोंधळातच प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर आदिवासी विकास विभागाची कागदपत्रे पटलावर ठेवली जात असतानाच खडसे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. एकनाथराव खडसे यांच्या मागणीला विरोधी पक्षांकडूनही जोरदार पाठिंबा मिळाला.

एमआयडीच्या भूखंडांची माहिती मागतोय आणि सहा-सहा महिने सरकार माहिती देत नाही. सरकारने भूखंडासंदर्भातील काढलेले १९९५ चे परिपत्रक मेलेय की जिवंत आहे? या भूखंडाच्या व्यवहारात ङ्गार मोठा प्रमाणावर अङ्गरातङ्गर झाल्याची शक्यता असून ही माहिती सभागृहासमोर आली पाहिजे.

कोणत्याही परिस्थितीत अधिवेशन संपायच्या आत मंगळवार, बुधवारपर्यंत ही माहिती मिळायलाच हवी अशी मागणी त्यांनी केली. खडसे यांच्या या मागणीला अजित पवार यांचाही पाठिंबा मिळाला. पवार म्हणाले, माहिती मिळविण्याचा अधिकार १२ कोटी जनतेला असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाच माहिती न मिळणे हा अन्याय आहे.

सरकार माहिती देत नाही याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरतंय सरकारने अधिवेशनच्या संपायच्या ही माहिती सभागृहासमोर आणावी. यावेळी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी माहिती न दिल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई माहिती अधिकार कायद्यांतर्गत केली जाते. अशा परिस्थितीत संबंधितावर निदान हा दंड ठोठावण्याची तरी कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावेळी विखे पाटील यांनी सरकारच्या मंत्र्यांवरचे आरोप वाढत चालले आहेत. भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप केला.

अधिवेशन संपण्याआधी माहिती सभागृहासमोर ठेवणार

यावेळी तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी आदिवासी विकास योजने अंतर्गत येणार्‍या अहवालाविषयी एकनाथराव खडसे यांनी विषय उपस्थित केला आहे. तेव्हा अधिवेशन संपेपर्यंत ही माहिती द्यावी, असे निर्देश दिले.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती अधिवेशन संपण्याआधी सभागृहासमोर ठेवली जाईल, असे आश्‍वासन दिले. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकनाथराव खडसे यांना जोरदार समर्थन देत बसल्या जागेवरुनच घोषणा सुरु केल्या की खडसेंना दिली सजा, मेहता मारतोय मजा…खडसे उपाशी मेहता उपाशी.. अशा घोषणा दिल्या.

LEAVE A REPLY

*