जिल्ह्यातील 80 हजार 361 शेतकर्‍यांचा पीक विमा

0
जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार असे एकुण 80 हजार 361 शेतकर्‍यांच्या पिक विम्यापोटी 15 कोटी 78 लाख रूपयांचा प्रिमीयम भरण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा उतरविण्यासाठी आज रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत होती. जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनाही शेतकर्‍यांचे विमा अर्ज स्विकारण्याचे आदेश शासनाने दिले होते.

दि. 31 जुलैपर्यंत विमा उतरविण्यासाठी अंतीम मुदत होती. मात्र राज्य शासनाने केंद्र सरकारला केलेल्या विनंतीवरून ही मुदत दि. 4 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती.

त्यामुळे जिल्ह्यातील 78 हजार 351 कर्जदार तर 2010 बिगर कर्जदार अशा एकुण 80 हजार 361 शेतकर्‍यांचा पिक विमा उतरविण्यात आला असुन 15 कोटी 78 लाख रूपयांचा प्रिमीयम भरण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.

यात एकट्या जिल्हा बँकेने 63 हजार 101 शेतकर्‍यांचा पिक विमा उतरविला आहे.

जिल्ह्यात 10 टक्के ऑनलाईन अर्ज अपलोड
पिक विमा अर्ज भरतांना शेतकर्‍यांना अडचण येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जनसेवा केंद्रांमार्फतही अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरू होती.

या केंद्रांमार्फत 10 टक्के शेतकर्‍यांचे पिक विम्याचे अर्ज ऑनलाईन अपलोड करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*