डीपीडीसीच्या 35 जागांसाठी चार सप्टेंबरला निवडणूक

0

जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-जिल्हा नियोजन मंडळाच्या रिक्त 35 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

जिल्हा परीषद आणि नगरपरीषदांच्या निवडणूकीनंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या काही जागा रिक्त झाल्या होत्या. मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा नियोजन मंडळाच्या 27 जिल्हा परिषद आणि 8 नगरपरिषद अशा एकूण 35 रिक्त जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असुन त्याबाबतचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
दि. 10 ऑगस्टपर्यंत सकाळी 11 ते 5 यावेळेत नामनिर्देशन पत्र भरणे, दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी, दि. 19 ऑगस्ट रोजी 5 वाजेपर्यंत माघारीची मुदत राहणार असुन आवश्यकता भासल्यास दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत मतदान होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*