ट्रकमध्ये केबल अडकल्याने विद्युत पोल वाकले : जीवितहानी टळली

0
जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-मेहरुण परिसरातील रस्त्यावर ट्रकमध्ये क्रॉसकेबल अडकल्याने विद्युत पोल वाकून परिसरातील मुख्य विद्युत वाहिन्या तुटल्या.
दरम्यान मुख्य केबलचा विद्युत प्रवाह जवळ असलेल्या दुकानात उतरल्याने सुदैवाने दुकानातील तिघे बालंबाल बचावले. मुख्य वाहिन्यासह परिसरातील वाहिन्या तुटल्याने संपुर्ण मेहरुण परिसर रात्री उशिरापर्यंत अंधारात होता.

या घटनमुळे महावितरणचे जवळपास 60 हजारांचे नुकसान झाले असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, मेहरुण परिसरातील पाणी पुरवठा युनिट कार्यालयाजवळील रस्त्यावरुन जाणार्‍या एमएच 18 बीजी 2784 ट्रॅकमध्ये क्रॉसकेबल अडकल्याने चक्क दोन विद्युत पोल वाकले.

यावेळी कॉसकेबल तुटल्याने जवळ असलेल्या मोक्षदा जनरल दुकानात विद्युत प्रवाह उतरला. यावेळी भाग्यश्री रुपचंद सोनवणे यांना किरकोळ विजेचा झटका बसला. सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही.

मेहरुण परिसर अंधारात
क्रॉसकेबल ट्रॅकमध्ये अडकल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले. दोन पोल वाकल्याने परिसरातील मुख्य वीज पुरवठा खंडीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे वीजपुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मेहरुण परिसर अंधारात होता.

पोलिसांनी ट्रक घेतला ताब्यात
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ याबाबत महावितरणला माहिती दिली. महावितरणचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत रस्त्यावरील पोलिस व नागरिकांनी थांबविली होती. महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहचल्यानंतर मुख्य वीज प्रवाह खंडीत करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी ट्रकसह चालक दिपक माळी याला ताब्यात घेतले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*