माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांना पत्राद्वारे धमकी

0
जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-बळीराम पेठेतील भाजीपाला विक्रेत्यांना नाहक त्रास दिल्यास आपल्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल अशा धमकीचे पत्र माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांना प्राप्त झाले. दरम्यान पाटील यांनी याबाबत शनिपेठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

बळीरामपेठ- शनिपेठ परिसरातील माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांना प्राप्त झालेल्या धमकीपत्रात असे म्हटले आहे की, शहर भाजपा समाजसेवक व कार्यकर्त्यांकडून कळविण्यात येते की, आपण भाजीपाला विक्री करणार्‍या स्त्री व पुरुषांना दि.29 रोजी सकाळी 8 वाजता हटवित होते.

आपण अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहात का? आपण भाजीपाला विक्रेत्यांवर दादागिरी करून दमदाटी शिवीगाळ करून आपण गरीब जनतेस नाहक त्रास देत आहे.

आम्ही प्रत्यक्ष तुमचा प्रताप पाहिला म्हणुन आम्ही आपणास समज देत आहोत की आपला मनपा अतिक्रमण विभागाशी काहीएक संबंध नसतांना आपली चुक आहे.

आपले घर फक्त पायरीच्यावर आहे आपला मनपा रोडवर काहीएक संबंध नसतांना भाजीपाला हॉकर्सना नाहक त्रास देणे गैर आहे.

आपण फक्त आपले घर सांभाळा बाकी मनपा अतिक्रमण विभागास फोन वगैरे काही करण्याची गरज नाही. आपण भाजीपाला विक्रेत्यांना त्रास दिल्यास भाजपचे कार्यकर्ते आपल्या विरुध्द दादागिरी करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे याबाबत पोलिस अधिक्षकांकडे तसेच गिरीष महाजन व गृहमंत्री व मुख्यमंत्री आपल्यासोबत राहणार्‍या विरुध्द गुन्हा दाखल करतील असा मजकुर धमकी पत्रात आहे. याबाबत माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*