अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

0
जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-शहरातील मेहरुण परिसरातील रामनगर येथे अल्पवयीन तरुणाने 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना दुपारी मनपाच्या शाळा क्रमांक 50 जवळ घडली.
दरम्यान नागरिकांच्या मदतीने या अल्पवयीन तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिस व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की,मेहरुणमधील रामनगरात असलेल्या मनपाच्या 50 क्रमांकाच्या शाळेलगत अंगणात एक 8 वर्षीय बालिका खेळत होती.

दरम्यान परिसरातील एका शाळेत शिकणार्‍या 13 वर्षीय तरुणाने या बालिकेचे तोंड दाबून तिला अंगणात उचलून शाळेच्या शौचालयात नेवून अतिप्रसंग केला.

दरम्यान बालिकेने चोर-चोर म्हणत आरडाओरड करीत घरी रडत रडत आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्या तरुणास पकडले.

दरम्यान नागरिकांनी या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी अल्पवयीन तरुण व बालिकेला पोलिस स्टेशनला आणले.

त्यानंतर बालिकेकडून पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. त्यानंतर बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांच्यासह पथकाने जिल्हा रुग्णालयात आणले.

दरम्यान घटनास्थळी भुसावळ विभागाचे डीवायएसपी निलोत्पल यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

LEAVE A REPLY

*