Blog : चंद्राला कवेत घेताना…

0

चंद्रावर मानवाने पाय रोवून ४८ वर्षे झाली. २०१८ मध्ये अनेक देशांची याने चंद्रावर सोडली जाणार आहेत. भारताचीही चांद्रमोहीम-२ याच वर्षी असून मोहिमांमध्ये झालेला ठळक ङ्गरक असा की आता खासगी कंपन्याही चांद्रमोहिमा हाती घेऊ लागल्या आहेत.

खासगी चांद्रमोहिमांमध्ये भारताची ‘टीम इंडस’ आघाडीवर असून डिसेंबरमध्ये ही मोहीम निश्‍चित करण्यात आली आहे. पीएसएलव्हीच्या मदतीने हे यान झेपावणार आहे.

चंद्राचे आकर्षण मानवाला शेकडो वर्षांपासून आहे. नील आर्मस्ट्रॉंग या अंतराळवीराने चंद्रावर पाऊल ठेवले, त्याला आता ४८ वर्षे झाली. पुढील वर्षी म्हणजे २०१८ मध्ये बर्‍याच चांद्रमोहिमा निघणार आहेत. या मोहिमांमध्ये झालेला मूलभूत बदल म्हणजे आता खासगी कंपन्याही या मोहिमांसाठी सरसावल्या आहेत. ‘टीम इंडस’ ही भारतीय खासगी मोहीम येत्या डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे.

नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून ४८ वर्षांनंतरही मानव चंद्रापेक्षा दूरच्या भूभागावर पोहोचलेला नाही. मंगळावर मोहिमा सुरू आहेत. तेथे मानवी वस्ती कशी तयार करता येईल, तेथील गरम हवेपासून संरक्षण देणार्‍या इमारती कशा बांधता येतील, तेथे शेती कशी करता येईल याच्या योजना आखल्या जात आहेत.

मात्र मंगळावर जाण्यासाठी इतका कालावधी लागतो की जेव्हा त्या वेगाने प्रवास करणारी याने निर्माण होतील तेव्हाच हे स्वप्न खर्‍या अर्थाने पाहता येईल. मंगळ आपल्यापासून ५ कोटी किलोमीटर एवढ्या प्रचंड अंतरावर आहे.

त्यामुळे तेथे पोहोचून वसाहती उभ्या करणे ही गोष्ट नजीकच्या भविष्यात शक्य होईल, असे मानता येत नाही. परंतु मानवाने त्या दिशेने खंड न पडू देता प्रयत्न केल्यास अनेक वर्षांनंतर ती गोष्ट कदाचित साध्यही होईल. परंतु सध्या तरी मानवाला ५ कोटी किलोमीटर अंतरापेक्षा ३ लाख ८४ हजार किलोमीटरवर असलेला चंद्र अधिक ‘जवळचा’ वाटत आहे.

१९६९ मध्ये चंद्रावर पहिले पाऊल मानवाने ठेवले तेव्हा आजच्या एवढी गतिमान याने नव्हती. त्यामुळे आता हे अंतर सहज पार करता येणारे वाटू लागले आहे.

चंद्रावर पोहोचलेल्या माणसाला तात्काळ मदत लागली तरी ती पोहोचवण्याची व्यवस्था करणे तुलनेने खूप सोपे आहे. त्यामुळेच भारत, चीन आणि आता जपानही चांद्रमोहिमेचा बेत करीत आहे. जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने २०३० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

तत्पूर्वी अमेरिका २०२५ च्या दरम्यान चंद्राजवळ अंतराळ केंद्र उभारणार असून त्या मोहिमेतही जपान सहभागी होणार आहे. ‘नासा’ या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेतर्ङ्गे उभारण्यात येणारे हे केंद्र पुढे मंगळाच्या मोहिमांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. जपानी अंतराळवीर आधी या अंतराळ केंद्रावर दाखल होईल आणि नंतर चंद्रावर उतरेल, असे संकेत जपानने दिले आहेत.

या स्पर्धेत भारतही मागे नाही. मंगळावर यान पाठवण्याचा पहिलाच प्रयत्न करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. चांद्रमोहीमही भारताने पूर्वीच ङ्गत्ते केली आहे. ‘इस्रो’ या भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने एकापाठोपाठ एक विक्रम आपल्या नावावर नोंदवायला सुरुवात केली असून १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित केल्यानंतर आपल्या आशियाई भावंडांना भारताने चक्क एक दूरसंचार उपग्रह भेट म्हणून दिला आहे.

त्यामुळे भारतीयांना आता चंद्रावरची सङ्गर ङ्गारशी अवघड राहिलेली नाही. मात्र त्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ ‘इस्रो’ला लागणार आहे. अन्य देशांचे उपग्रह प्रक्षेपित करून ‘इस्रो’ने प्रक्षेपण हा ‘व्यवसाय’ यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे या संस्थेने चांद्रमोहिमेसाठी खर्च केलेला पैसा वाया जाणार नाही एवढे खरे. आता खासगी कंपन्याही चांद्रमोहिमेत रस दाखवत असल्यामुळे पैसा एकवटणेही ङ्गारसे अवघड राहिलेले नाही.

भारताव्यतिरिक्त अमेरिका, चीन, जपान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आदी देशांनी चांद्रमोहिमांची जोरदार तयारी चालवली आहे. चांद्रयान-१ च्या यशानंतर भारत पुढील वर्षी चांद्रयान-२ ही मोहीम हाती घेणार आहे. या एकाच वर्षात चंद्रावर एकंदर सहा उपग्रह पाठवण्यात येणार आहेत.

त्यातील एक उपग्रह चीनचा असेल. ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ पुढील वर्षी हा इतिहास रचण्याची तयारी करीत आहेत. २०१८ च्या पहिल्या तिमाहीत चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारत आपली ताकद पणाला लावणार आहे. या मोहिमेत भारतात उत्पादित केलेले एक चांद्रयान, एक रोव्हर आणि एक लँडर सामील होणार आहे.

चांद्रयान-२ मोहिमेत यान चंद्राच्या अशा भागात उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जेथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही. अन्य देशांच्या चांद्रयानांमध्ये छोटे-छोटे न्यूक्लिअर रिऍक्टर बसवलेले असतात. भारताचे चांद्रयान मात्र सौरऊर्जेवर प्रवास करणार असून हे अतिशय आव्हानात्मक आहे.

चांद्रयान-१ मध्येही सौरऊर्जेचा वापर करण्यात आला नव्हता. चंद्रावर सोडण्यात येत असलेला उपग्रह तेथे पिकांचे उत्पादन कितपत शक्य आहे, याचा अंदाज घेणार आहे. त्याचवेळी भारतीय रोव्हर चंद्रावरची माती आणि खडक विश्‍लेषणाच्या हेतूने जमा करणार आहे.

अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेतर्ङ्गे चंद्रावर भक्कमपणे पाय रोवण्याचे प्रयत्न आगामी वर्षांमध्ये करण्यात येतील. २०१८ मध्ये ‘नासा’तर्ङ्गे चंद्रावर सहा उपग्रह पाठवण्यात येणार आहेत. ईएम-१, लुनर फ्लॅशलाईट, बायोसिटेनेल, लुनर आईसक्यूब, लुनारमॅप आणि टॅस अशी नावे असलेले हे उपग्रह चंद्रावर आपापले संशोधनकार्य सुरू करतील.

‘नासा’चा प्रमुख उद्देश चंद्रावर पाण्याचा शोध घेणे हा असून सौरऊर्जा प्रकल्पाचीही तयारी करण्यात आली आहे. उपग्रहाच्या माध्यमातूनच तेथे सौरऊर्जा निर्माण करण्याचा ‘नासा’चा प्रयत्न असेल. तेथून लेझर बीमच्या सहाय्याने ही ऊर्जा पृथ्वीवर पाठवण्याचा प्रयत्न राहील.

एकंदरीत अनेक देशांनी चांद्रमोहिमांसाठी जय्यत तयारी केली आहे. अमेरिकेच्या टेसा या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी ४.८३ अब्ज, ईएम-१ साठी ४२६ अब्ज २९ कोटी तर मून एक्स्प्रेससाठी ६४.४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गुगल लुनर एक्सप्राईज मोहिमेवर अमेरिकेने आतापर्यंत ३८.७ कोटी रुपये खर्च केले आहेत.

भारताच्या चांद्रयान-२ साठी अंदाजे ६०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा अंदाज २०१५ मध्ये काढण्यात आलेला असल्यामुळे खर्चाच्या अंदाजात बदल होऊ शकतो. इस्रायलने आतापर्यंत स्पेसआयएल या यानावर २.३२ अब्ज रुपये खर्च केला आहे. चीनच्या सर्व चांद्रमोहिमांचा वार्षिक खर्च आहे १९३ अब्ज ३८ कोटी रुपये तर जपान अशा मोहिमांवर वर्षाकाठी ८०५ कोटी ७५ लाख रुपये खर्च करीत आहे.

सामान्यतः २०३० च्या आसपास अनेक देशांनी चंद्र कवेत घेण्याच्या योजना आखल्या असून ही आता एक शर्यत ठरली आहे. २०२५, २०२८ आणि २०३० मध्ये रशिया या शर्यतीत असेल. उत्तर कोरियातर्ङ्गे २०२६ मध्ये चंद्रावर यान उतरवले जाणे शक्य आहे.

२०२० मध्ये मून ऑर्बिटर पाठवण्याची तयारी दक्षिण कोरियाने केली आहे. लुनर मिशन-१ ही ब्रिटनची मोहीम २०२४ च्या आसपास पूर्ण होऊ शकते. २०३० मध्ये जपान आणखी एक उपग्रह चांद्रमोहिमेसाठी पाठवेल, तर चीनही २०३६ मध्ये आणखी एक उपग्रह चंद्रावर पाठवेल.

प्रत्येक देशाचा चांद्रमोहिमेचा उद्देश वेगवेगळा आहे. परंतु अनेक देश चंद्रावर जीवन आणि पाण्याचा शोध घेणार आहेत. ‘नासा’ हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारी यंत्रणा चंद्रावरून संचालित करू पाहत आहे तर चीन आपल्या सॉफ्टवेअर साईटस् अधिक मजबूत करू पाहत आहे.

जपानचा उद्देश किरणोत्सर्गाचे मापन करण्याचा आहे. एकंदरीत चंद्राला कवेत घेण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातून प्रयत्नांना सुरुवात झाली असून आगामी वीस वर्षांत आपल्याला वेगळेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारत किती वेगाने धावणार याचे कुतूहल सर्वांनाच लागले आहे.

– प्रा. विजया पंडित

LEAVE A REPLY

*