तीन लाखांचा मद्यसाठा जप्त

0
भुसावळ |  प्रतिनिधी : भुसावळ सह महामार्गावरील नशिराबाद येथे देशी, विदेशी, गावठी मद्याची सर्रास अवैध विक्री होत असल्याच्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या ईआरटी पथकाने विभागात ७ ठिकाणी छापे मारुन देशी, विदेशी व गावठी हातभट्टी मद्याच्या साठ्यासह ३लाख ३ हजार ९७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून करण्यत आली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या, शहर व नशिराबाद येथे दारुची अवैध विक्री सर्रास सुरु असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी त्यांच्या पथकातील पोउनि अंगद नेमाने व पो.कॉं. संकेत झांबरे, पो.कॉ. विशाल सपकाळे, पो.कॉँ. विनोद वितकर, पो.कॉं. नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, राजेंद्र साळुखे, पो.ना. संदीप पालवे, पोहेकॉं.अयाज अली सैयद, ईआरटी पथकचे चो.ना. सुनील सैंदाणे, सुनील थोरात, पो.कॉं.प्रशांत चव्हाण, श्रीकृष्ण देशमुख, प्रदीप इंगळे, इश्तीयाक अली सै. व आरसीपी प्लाटुन पोकॉ. संदीप जोशी, हर्षल पाटील यांच्या पथकाने नशिराबाद, भुसावळ शहर पोस्टे व बाजारपेठ पोस्टे हद्दीत कारवाई केली.

शहर पो.स्टे हद्दीतील कंडारी भागात आरोपी मनोज फकिरा देवरे (रा. कंडारी प्लॉट,भुसावळ) हा अवैध दारुची विक्री करत असतांना केलेल्या कारवाईत त्याच्या ताब्यातील ६१ हजार ४६६ रुपये किमतीची देशी, विदेशी दारु जप्त करण्यात आली. मात्र आरोपी घटनास्थळावरुन फरार झाल.याबाबत शहर पोलिसात प्रोव्हीशन गु.र.नं. ४०/१७ मुंबई प्रोव्हीशन ऍक्ट क ६५ (ई) नुसार नोंद करण्यात आली.

बाजार पेठ पो.स्टे. हद्दीत, आरोपी भिमराव जानु इंगळे (रा. वाल्मिक नगर, ७२ खोली) विवेक उर्फ विक्की किशोर टाक (रा.वाल्मिक नगर, ७२ खोली) , सुरेश भवरीलाल भट (रा.दत्त नगर भुसावळ) यांच्या जवळून २हजार ६५५ रुपयांची गावठी हातभट्टी व देशी दारु जप्त केली. भिमराव इंगळे घटनास्थळावरुन फरार झाला.

याबाबत बजार पेठ पोलिसार पोव्ही.गु.र.नं. २६, २७, २८/ १७ , मुंबई प्रोव्हीशन ऍक्ट कलम ६५ (ई) नुसार नोंद करण्यात आली.

नशिराबाद पो.स्टे हद्दीत, अनिल दगडू भोई (रा. इंदिरा चौक नशिराबाद याच्या ताब्यातील १हजार ९१० रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. प्रदीप लक्ष्मण बोडणे (रा. सुनसगाव रोड, नशिराबाद) याच्या जवळून ६७ हजार रुपयांची देशी, विदेशी दारु व २ लाख रुपयांची चारचाकी असा २लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

आरोपी विलास सिताराम महाजन (रा. जिल्हा पेठ, जळगाव) याच्या जवळून ६हजार २४० रुपयांची देशी, विदेशी दारु जप्त करण्यात आली. याबाबत नशिराबाद पो.स्टे.ला प्रो. गु.र.नं. २०, २१, २२/१७, मुंबई प्रोव्हीशन ऍक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

*