सकारात्मक विचार हाच यशाचा मार्ग – डॉ.काटदरे

0
जळगाव |  प्रतिनिधी :  आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपड करीत आहे. पण यशस्वी होणे म्हणजे नेमकी काय करावे या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नसते. त्यामुळे परिस्थितीशी सामना करून त्यावर सकारात्मक विचाराने कृती करणे महत्वाचे आहे.

व्यवसाय आणि नोकरी हे दोन यशाचे मार्ग आहेत. स्वताच्या विचारांवर विश्वास ठेवून कृती करणे अपेक्षित असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वत:ची नियमावली तयार करून घ्यावी. यशाची जर आपली ओळख बनवायची असेल तर आत्मीय ऊर्जाशक्तीचा वापर करा.

तुमच्या आतील कौशल्याने तुम्ही ठरवलेले धेय निश्चीत करू शकतात परंतु कौशल्य विकसित करणेसाठी सराव तेवढाच महत्वाचा आहे. असे मत डॉ.विवेक काटदरे यांनी व्यक्त केले.

जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंटमध्ये एमबीएच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वागतपर जुनून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सिनिक समूह धुळे येथील व्यवस्थापकीय संचालक निरंजन बटवाल, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, डॉ.दीपक शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ. काटदरे म्हणाले की, गरज हि शोधाची जननी आहे. वेळे नुसार मानवाला बदल स्वीकारणे आवश्यक आहे. सामाजिक बदलानुसार त्याला जीवन जगणे गरजेचे आहे, आणि परिस्थितीचा स्विकार करायला शिका. तसेच सामाजिक तथा स्वत:चा विकास साध्य करण्यासाठी विचारांप्रमाणे घेतलेल्या निर्णयात सातत्य टिकवून ठेवणे अत्यावश्यक आहे.

त्यासाठी तुमची इच्छाशक्ती फार प्रबळ हवी असे मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित निरंजन बटवाल यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या जीवनातील महत्वाचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. तुमची आवड हेच तुमच्या जीवनात सर्वोच्च स्थान आहे.

त्यासाठी त्या दिशेन प्रवास करणे अपेक्षित आहे. मानवाने आपल्या आतील दडलेल्या उर्जाशक्तीचा पूर्णपने वापर केल्यास सामाजिक विकासात क्रांतिकारी बदल घडू शकतो.

नोकरी किंवा व्यवसाय करताना तुमच्या कामावर प्रेम करा पैसा मिळणे अपेक्षितच आहे. तसेच सकारात्मक विचारला आचरणात आणून आपल्या कामात सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत संचालिका डॉ.प्रिती अगरवाल यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.

त्यांनी महाविद्यालयातील सोई सुविधा, विद्यार्थ्यांसाठी इतर कोर्सेस व अभ्यासक्रमाची माहिती देत सर्व शिक्षकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.

LEAVE A REPLY

*