शौचालय बांधणेसाठी भातखंडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र

0
भातखंडे, ता.भडगाव | वार्ताहर : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असल्याने जन जागृती करण्यासाठी नवनियुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या संकल्पनेतून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र पाठवित असून पत्राद्वारे भावनिक साद घालून शाळेतील इयत्ता १० वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शौचालयाचे महत्त्व या विषयावर पत्रं लिहिली

यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जी. जे. पाटील व शाळेतील जेष्ठ शिक्षक तथा स्वच्छतादूत बी.एन.पाटील यांनी याबाबत अगोदर स्वच्छतेबाबत व शौचालया बाबत माहिती दिली.

स्वच्छतेबाबतीत महिला जागरूक असल्या पाहिजेत आणि उघड्यावर शौचास जायला नकार देण्याची भूमिका घेतली तर गावात पटापट शौचालये बांधले जातील.

प्रत्येकाच्या घरी एक शौचालय बांधली जावी यासाठी जागृती व्हावी म्हणून येथील शाळेतील इयत्ता१० वी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना शौचालयाचे महत्त्व पत्र पाठवुन त्याबाबत जाणीव/जागृती करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी तीन गटात पत्र लिहिली.

त्यात पहिला गट ज्याच्याकडे शौचालय नाही, दुसरा गट ज्याच्या कडे शौचालय आहे आणि तिसरा गट की ज्याच्याकडे शौचालय आहे पण ते त्याचा वापर करत नाही, या प्रमाणे गट तयार करून दिलीत शाळेने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या माध्यमातून पालकांनी या पत्रं प्रपंचातुन बोध घेऊन शौचालय बांधले तर नक्कीच काही तरी ङ्गलश्रुती झाली असे समजावे लागेल.

LEAVE A REPLY

*