मतदारसंघात अधिक जोमाने कामाला लागा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील खासदारांना आदेश

0
जळगाव | प्रतिनिधी : केंद्र सरकारला एक हजार दिवस पुर्ण झाले असुन मतदारसंघात अधिक जोमाने कामाला लागा असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह गोवा प्रांतातील खासदारांना आज बैठकीत दिले.

महाराष्ट्रासह गोवा प्रांतातील भाजपा खासदारांची बैठक आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत मोदींनी दोन्ही राज्यातील लोकसभा क्षेत्रामध्ये खासदारांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. जळगाव जिल्ह्यातून खा. रक्षा खडसे व खा. ए.टी.पाटील हे देखिल या बैठकीला उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी मतदारसंघनिहाय आढावा घेऊन मतदारसंघातील कामे जाणून घेतल्याची माहिती खा. रक्षा खडसे यांनी ‘दै. देशदूत’शी बोलतांना दिली.

दरम्यान मतदारसंघात अधिक जोमाने कामाला लागण्याचे आदेशही मोदींनी दिले आहे. या बैठकीत काही खासदारांची झाडाझडतीही घेतल्याचे समजते. केंद्र सरकारने केलेली विकास कामे, सामान्य जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सुचनाही मोदींनी बैठकीत दिल्या.

LEAVE A REPLY

*