Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या सेल्फी

अक्षय तृतीया : सावधान सोन्यावरील सूट असू शकते फसवी

Share
नवी दिल्ली  : अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात. हे लक्षात घेत बाजारात आकर्षक सवलती दिल्या जातात. मात्र, या सवलतींकडे पाहून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते हे ग्राहकांच्या ध्यानीमनीही नसते. सोन्यासारख्या मौल्यवान धातूंमध्ये मोठी सूट देणे तसे शक्य नसते असे जाणकारांचे म्हणणे आहे. सामान्य ग्राहक मात्र घडणावळीवर दिलेली सूट म्हणजे पूर्ण दागिन्यावर दिलेली सूट आहे असे मानून दुकानात जातात. मात्र, सावधान! घडणावळीवरील सूट सोन्याच्या शुद्धतेशी तडजोड करायला लावणारी असू शकते.
सामान्य ग्राहक मात्र घडणावळीवर दिलेली सूट म्हणजे पूर्ण दागिन्यावर दिलेली सूट आहे असे मानून दुकानात जातात. मात्र, सावधान! घडणावळीवरील सूट सोन्याच्या शुद्धतेशी तडजोड करायला लावणारी असू शकते. हे लक्षात घेता कोणताही दागिना खरेदी केल्यानंतर चुकवलेल्या पैशांप्रमाणे आपल्याला धातूची शुद्धता मिळाली की नाही, हे तपासणे गरजेचे आहे.

शुद्धतेत हेराफेरी

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (BIS) नुकतेच देशभरात बनावट हॉलमार्किंग करणाऱ्यांविरोधात छापेमारी केली होती. त्यानंतर हॉलमार्कमध्ये हेराफेरी करता येऊ शकते या बाबतचा संशय बळावला होता. मात्र, हॉलमार्क शुद्धतेची हमी देतो आणि काही किरकोळ घटना वगळता आजही लोकांचा यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बीआयएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्याच्या शुद्धतेबाबत तुमच्या मनात शंका असल्यास, तुम्ही ३५ रुपये देऊन लॅब टेस्टिंग करू शकता. दिल्लीमध्ये ३६ बीआयएस सर्टिफाइड टेस्टिंग सेंटर आहेत.

धातूच्या किंमतीवर सूट मिळू शकत नाही

आपल्या नफ्याशी तडजोड करून कोणताही सराफ धातूच्या मूल्यावर कोणतीही सूट देऊ शकत नाही, असे द बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांचे म्हणणे आहे. खरे तर सूट केवळ घडणावळीवरच दिली जाते. मात्र, यातही सराफाचा ५-१० टक्क्यांचा लेबर चार्ज लावलेला असतोच.

जर तो ते सोडत असेल, तर मग तो सोन्याच्या शुद्धतेशी तडजोड करत असण्याची दाट शक्यता असते. असे ही होऊ शकते की, तुम्ही खरेदी केले २२ कॅरेटचे सोने, प्रत्यक्षात तुम्हाला मिळाले १८ कॅरेटचे सोने. या साठी ग्राहकाने खरेदीनंतर एखाद्या जवळच्याच सेंटरला भेट देत तपासणी करून शुद्धतेची खात्री करून घेतलेली बरी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!