मेरे दिल मे आज क्या है तु कहे तो मे बता दू |

0
मॉडेलींगबरोबर दर्दभर्‍या सुरावटीनं तर कधी प्रणयी भावमधुर गीतांनी फेर धरणारा कधी खुप खुप हसवणारा तर कधी खिन्न, दुःखी, उदास करणारा अष्टपैलू व हुरहुन्नरी सिने कलावंत व गायक किशोर कुमारच्या जयंती निमित्त हा प्रासंगीक लेख|
वाचलेल्या परीकथांमध्ये एका गाण्याच्या झाडाची गोष्ट वाचल्याचे आठवते… समुद्रापलीकडे असणार्‍या त्या झाडातुन नेहमी मंजुळ स्वर एकू येत असत. कुठलीही असाध्य व्याधी दूर करण्याची दिव्यशक्ती त्या स्वरांमध्ये होती, असे त्या असाधारण झाडाचे वर्णन केलेले होते.

तेव्हा ही गोष्ट अगदी खरी वाटली होती. आपल्याला ते गाणारे झाड बघायला मिळाले असते तर किती चांगले झाले असते असे बर्‍याचदा मनाला वाटून गेले.


आज ही गोष्ट प्रकर्षाने आठवण्याचे कारण म्हणजे ४ ऑगष्ट किशोर कुमार नावाच्या गाणार्‍या झाडाचा जन्मदिवस (जयंती) किशोर कुमार हे असे गाण्याचे झाड होते की, ज्यांच्या शाखांमध्ये पानांमध्ये, फुलांमध्ये फक्त संगीतसुर व गीतच भरलेले आहे.

त्यांची संगीत स्वरांनी भरलेली शाखा म्हणजे अभ्यास विषयाचे एक स्वतंत्र दालन आहे. त्यांच्या वैगवेगळ्या आकाराच्या भिन्न-भिन्न रस-रुप गंधाच्या गीत पुष्पांच्या आपण नित्य अस्वाद घेत असतो. त्या मोहक फुलांच्या अविट गोडीने त्यातून झरणार्‍या श्रवणामृताने सुखावतो. तृप्त होतो.

आपल्याला काही काळासाठी का होईना, परंतु चिंतामुक्त करुन वेगळ्या मयुरपंखी, आनंददायी विश्‍वात घेवून जाण्याचे सामर्थ्य स्व.किशोरकुमारच्या गाण्यात होते. गीतांपासुन भजन, कव्वाली, गझल काय वाटेल ते गायला सांगा….| त्यांचा आवाज म्हणजे जणू ईश्‍वराचा तोहफा|

सर्वार्थाने सर्व प्रकारची गाणी गुण्यागोविंदाने त्यांच्या गळ्यात नांदत होती. किशोर कुमार यांची गाणी सांगत बसणे म्हणजे जणू धान्यांच्या कोठारातला एक एक दाणा मोजत बसण्यासारखे आहे. ज्यांच्याकडे किशोर कुमार गायला नाही असा एकही हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतकार नसेल असे वाटते.

सर्वांच्या रेकॉर्डींग रुममधुन तो सुगंधासारखा दरवळला. १९५४ ते १९६५ या काळात भाई भाई, नया अंदाज, नई दिल्ली, आशा, चलती का नाम गाडी या चित्रपटांचा नायक म्हणुन किशोर कुमारचा दबदबा निर्माण झाला होता. दिलीप कुमार, राजकुमार यांच्या भुमिका बदलून त्यांना दिल्या जात होत्या.

परंतु १३ ऑक्टोबर १९८७ च्या दिवशी किशोर कुमारचे निधन झाले. किशोर कुमार जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अभिनयाने आणि पार्श्‍वगायनामुळे आपल्याला सदैव हवा हवासा वाटणारा किशोरदा याला आपण कसे विसरणार?

सर्वांना स्मरणात राहणारे आवाजाचे बादशाह किशोर कुमार परिषद मध्येप्रदेशद्वारा किशोर कुमार यांची समाधी बांधलेली असुन आज देखिल त्यांचे चाहते समाधी ठिकाणी जाऊन त्यांचे स्मरण करतात. कलावंत देखील या दिवशी येथे एकत्र येवून किशोर दादाची गीते गाऊन गीताद्वारे भावांजली वाहतात.

संकलन – राजीव बोरसे, निंभोरा

LEAVE A REPLY

*