न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास डीजे चालकांना लाखाचा दंड, पाच वर्षांची शिक्षा : एएसपी निलोत्पल यांची माहिती

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  आगामी उत्सवांमध्ये डीजे चालक मालकांनी न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांचे पालन कराने अन्यथा पर्यावरण अधिनियमांनुसार संबंधित डीजे चालक, मालकांवर कारवाई करण्यात येणार असून या  एक लाखांचा दंड व पाच वर्षाची शिक्षा असल्याने नियमांचे काटेकोर पालन करुन सर्व सामन्य जनतेला व स्वत:ला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

समाज, लोक, न्याय पालिका जागृत असल्याने आपणही जागृत होऊन व्यवसाय अडचणीत येणार नाही याची व चुकीच्या गोष्टींमुळे शहराचे नाव बदनाम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी केले.

बाजारपेठ पो.स्टेे.त आगामी गणेशोत्सवासह विविध उत्सवांनिमित्त आयोजित डीजे चालक मालकांच्या दि.२ऑगस्ट रोजी सायंकाळी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.प्रसंगी बाजरपेठचे पो.नि. चंद्रकांत सरोदे,शहर पोस्टेचेे प्रभारी एपीआय राहुल पाटील, एपीआय मनोज पवार उपस्थित होते.

आगामी उत्सवांमध्ये नियम तोडणार्‍यांवर पर्यावरण कायदा कलम १९८६ प्रामणे कारवाई करण्यात येणार असून या कायद्यात १ लाख रुपये दंड व पाच वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान आहे. कारवाई झाल्यास व्यवसायाचे नुकसान होईल ते टाळण्यासाठी न्यायालायाच्या आदेशांचे पालन करा.

उत्सवांपूर्व शहरातील गर्दीचा परिसर, मोठी मंडळांच्या परिसराचे क्लाउड नॉईज मशीनीद्वारे नोंद घेवून पुन्हा उत्सवांदरम्यानही नोंद घेतली जाईल ५० ते ७५ डेसीबल आवाज करणार्‍या दोषींंवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवा १० वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.

तसेच शेवट्या दिवशी विसर्जन मिरवणूकीसाठी रात्री १२ वाजेची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. यावेळेचे बंधन ठेवून वेळेतच मिरवणूका संपवाव्या. दरम्यान, या काळात आरटीओ पथकांकडून डीजे चालकांच्या वाहनांची चौकशी होणार असून आपल्या वाहनांची नोंदणी व तपासणी करुन घेण्याचे आवाहन ही श्री.निलोत्पल यांनी केले.

बाजारपेठ पो.नि. चंद्रकांत सरोदे यांनी, न्यायालयाचे आदेश व नियमांचे पालन करा, उत्सव आनंदात पार पाडा. गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू नका असे आवाहन केले.

एपीआय राहुल पाटील यांनी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण न होऊ देणे ही शहराच्या लौकिकासाठी चांगली बाब आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करा. कायद्याचा वचक ठेवल्यास आपले नुकसान होणार नाही असे सांगितले.यशसवीतसेसाठी गोपनीय शाखेचे छोटू वैद्य व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*