पालिकेची जीर्ण इमारत खाली करा : नगरसेविका संगिता देशमुख यांची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

0
भुसावळ | प्रतिनिधी : पालिकेची ब्रिटीश कालीन इमारत जीर्ण झाली असून. इमारत खाली करुन पालीकेचे कामकाज इरतत्र करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या असतानाही पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
शहरात घाटकोपरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इमारत खाली करण्याचे आदेश काढण्याच्या मागणी नगरसेविका संगीता प्रदीप देशमुख यांनी प्रांत अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतच्या निवेदनात, पालिकेची इमारत ब्रिटीशकालीन असून ती जीर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या पालिका भेटी प्रसंगी इमारत जीर्ण झाली असून इमारत खाली करुन एक महिन्यात इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मात्र एक महिना उलटून बराच काळ लोटूनही पालिकेने जिल्हाधिकारी यांच्या सुचनांची दखल घेतली नसल्याने जिल्हाधिकारी यांनी दुसर्‍या भेटीतही इमारतीबाबा विचारपूस केली होती. मात्र नगराध्यक्षांनी कोणतेही समाधावकारक उत्तर देण्यात आले नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांनी पालिकेला याबाबत पत्रव्यवहार केला असता खाजगी कंपनीकडून केलेल्या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल अद्याप पालिकेला प्राप्त झालेला नाही.

दरम्यान, आ. सतीष पाटील यांच्या आमदार निवासातील खोलीचे स्लॅब पडल्याची तसेच घटकोपरची दुर्घटना झाल्या आहे. अशा प्रकारची दुर्घटना होऊन पालिकेच्या इमारतीमुळे निष्पाप नागरिक व पालिका कर्मचार्‍यांची जिवित हानी होऊ नये यासाठी पुढाकार घेऊन इमारतीबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून तात्काळ इमारतीचे स्थलांतर करण्याबाबा आदेश द्यावेत व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अन्यथा होणार्‍या जिवित किंवा वित्त हानीसाठी पालिका प्रशासन जबाबतदार राहील असा इशारा नगरसेविका संगिता देशमुख यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*