Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारचिंचपाडा रेल्वे फाटकाजवळ पंधरा दिवसांचे जीवंत बाळ आढळले

चिंचपाडा रेल्वे फाटकाजवळ पंधरा दिवसांचे जीवंत बाळ आढळले

नवापूर Navapur । श.प्र.

तालुक्यातील चिंचपाडा (Chinchpada) ते वडकूट रेल्वे फाटकाच्या (railway crossing) दरम्यान एका शेताच्या झाडाझुडुपांमध्ये दहा ते पंधरा दिवसांचा स्त्री जातीचे जिवंत अर्भक (Living female infants) उघड्यावर मिळून आले. याबाबत चिंचपाडा पोस्ट येथे खबर देत चिंचपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) त्या बाळावर उपचार करीत बाळाच्या संदर्भात माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

नवापूर तालुक्यातील चिंचपाडा ते वडकुट रेल्वे फाटकादरम्यान एका शेतात झाडाझुडपांमध्ये एक बेवारस दहा ते पंधरा दिवसांच्या स्त्री जातीचे जिवंत बाळ (Living female infants) मिळून आले. रस्त्यावरून जाणार्‍या एका व्यक्तीस ते दिसले. त्यांनी असलेल्या चिंचपाडा आऊटपोस्ट (Chinchpada outpost) येथे माहिती देताच असई बळवंत वळवी, पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण, चिंचपाडा गावचे कारभारी संतोष वसावे यांनी घटनास्थळी जाऊन बाळाला ताब्यात (possession) घेतले.

चिंचपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) दाखल करत त्याच्यावर उपचार केले. याबाबत असई बळवंत वळवी यांनी नवापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली. हे बाळ ज्या कोणाचे असेल त्यांनी नवापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या