Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

महाराष्ट्र दिनी अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे झाले महाश्रमदान 

Share
अमळनेर | प्रतिनिधि :   येथील अनोरे गांवी १ मे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी महाश्रमदान करण्यात आले. अमळनेर सह परिसरातील गावाच्या ग्रामस्थानीं, युवक युवतींनी,सामाजिक संघटनांसह सोशल मीडियाच्या ग्रुपनेही श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेत जिद्दीने उतरलेल्या अनोरेवासीयांच्या प्रयत्नांना मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या विशेष पुढाकाराने उत्स्फूर्तपणे महाश्रमदान करून बळ दिले.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून अनोरे गावांमध्ये दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सुटीचा दिवस सार्थकी लावण्याच्या उद्देशाने गावकऱ्यांचे पाणीदार स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो नागरिक महाश्रमदानामध्ये सहभागी झाले.

महाश्रमदानासाठीचे नियोजन आधिच पाणी फाउंडेशन व सक्रिय ग्रामिण कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार आज पहाटेपासून उत्स्फूर्तपणे अनोरे, आर्डी,जवखेडे येथिल ग्रामस्थांनी हजेरी लावली.आ.शिरीष चौधरी यांनीही कार्यकर्त्यांसह सहभाग घेत उपस्थिती देऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.

अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थाचे अध्यक्ष डिगंबर महाले , खजिनदार गिरीश कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम , विश्वस्त सौ. जयश्री साबे हे मंगळदेव ग्रह मंदिरातील ६० सेवेकरीसह महाश्रमदानात सहभागी झाले. त्यांच्या आगळ्या-वेगळ्या गणवेशामुळे ते एकुणच कार्यक्रमात उठून दिसत होते . मंगळ ग्रह सेवा संस्थेने आनोरे हे गाव दत्तक घेतले आहे.

लायन्स क्लब चे अध्यक्ष प्रशांत सिंघवी , बाळू कोठारी व सदस्य,खा.शि .मंडळ संचालक योगेश मुंदडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, माझं गांव माझं अमळनेर व्हाट्सअप ग्रुपचे सुनिल भामरे,सोमचंद संदानशिव, मनोज शिंगाने,कुणाल साळी,अडव्होकेट दिनेश पाटील,विजय पाटील यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने श्रमदान केले. तर गावातील तरुण तरुणींसह लहान कु.शैलजित शिंदे हिनेही हिररीने श्रमदान केले.मा.सभापती श्याम अहिरे,नगरसेवक बबली पाठक,किरण गोसावी यांचे सह स्थानिक जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम नथु पाटील, बाजीराव पाटील, यांनी ग्रामस्थांसह श्रमदान केले.

पाणी फाउंडेशन चे टेक्निकल मास्टर ट्रेनर श्रीकांत सहस्रबुद्धे , टेक्निकल ट्रेनर सोनल नेहे, सोशल ट्रेनर शारदा वाळके,जि. प.सदस्य संदिप पाटिल यांनी महाश्रमदानात नियोजनानुसार कार्य पार पाडण्यासाठी विशेष लक्ष घातले. महाश्रमदानासाठी ‘आम्ही येतोय… तुम्ही देखील या!’असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते.

त्यास प्रतिसाद देत दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावांमध्ये पाणी संवर्धनाच्या कार्यात अनेकांनी सहभाग नोंदवला. तर यंदा गावातील तरुणाई या महाश्रमदानात मोठ्या संख्येने सहभागी झाली अनेक सामाजिक संस्थांनी देखील यात सहभाग घेत महाश्रमदानात हातभार लावला. मंगळ ग्रह मंदिर संस्थांनतर्फे भोजन प्रसादाची व्यवस्था श्रमकरी तथा जलमित्रांसाठी करण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!