यावल महालक्ष्मी पतसंस्थेचा अवसायकांनी घेतला ताबा : अखेर ठेवीदारांना दिलासा

0
यावल |  प्रतिनिधी  :  विभागीय सहा.निंबधक नाशिक यांच्या आदेशान्वये यावल येथील महालक्ष्मी नागरी सह. पतसंस्थेचे बंद कुलूप उघडून अखेर अवसायकाची नियुक्ती झाल्याने त्यांनी पदभार स्विकारुन आता अनेक ठेवीदारांना अडकलेल्या रक्कमा मिळण्यासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महालक्ष्मी नागरी सह. पतसंस्था गेल्या ४ /५ वर्षांपासुन बंद आहे. अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. तर भालोद येथील सखाराम महाराज पतसंस्थेचे महालक्ष्मीमध्ये १ कोटींच्या वर ठेवी अडकल्याने त्यांनी ग्राहकमंचाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ग्राहकमंचाने सखाराम महाराज पतसंस्थेला महालक्ष्मी पतसंस्थेस सिल लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सहकार खात्याचे अधिकारी भालोद पतसंस्थेने कुलूप लावले होते.

अडचणी असलेल्या पतसंस्थांची शासनाने यादी तयार केली होती. त्या नुसार महालक्ष्मी पतसंस्थेचा त्यात सहभाग होत त्या मुळे विभागीय सहा. निबंधक नाशिक यांनही संस्था चेअरमन यांना पत्रव्यवहार करुनही उठाव घेतला नाही.

मध्यंतरी व अंतिम आदेशामुळे अखेर १ ऑगस्ट २०१७ रोजी कारवाई होवुन वरिष्ठांच्या आदेशान्वये अवसायक म्हणुन ए. डी.बागले, सहा. निंबधक सहकारी संस्था मुक्ताईनगर यांनी पंचनामा करुन कुलूप उघडून संस्थेचा एकतर्फी चार्ज घेतला.

या वेळी यावल सहा.निंबधक सहकारी संस्था तुषार लावणे, मुख्य लिपीक एम पी भारंबे, सहा. सहकार अधिकारी यावल हेमंत पाटील, सखाराम महाराज पतसंस्था व्यवस्थापक किशोर नेहेते, वसुली अधिकारी प्रकाश झोपे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*