Type to search

maharashtra आवर्जून वाचाच दिनविशेष फिचर्स मुख्य बातम्या

जागतिक पासवर्ड दिन : काही महत्वपूर्ण टिप्स ज्या तुम्हाला सुरक्षित ठेवतील

Share
आपण आपल्या मौल्यवान गोष्टी सुरक्षित ठिकाणी ठेवत असतो त्याचप्रमाणे आपले ई-मेल, सोशल मिडिया अकाऊंट, मेमरीकार्ड आणि हार्डडिस्कमध्ये आपण आपल्या हवे असलेल्या फाईल्स आपण सेव्ह करून ठेवत असतो. त्यातील माहिती सुरक्षित राहावी कोणाला ती सहजपणे उपलब्ध होऊ नये यासाठी आपण त्याला पासवर्ड टाकून सेव्ह करत असतो.

१. पासवर्ड हा कोणासोबत शेअर करू नयेत.

२ प्रत्येक वेबसाईटवर, अँप्लिकेशनवर, मोबाईलला, कॉम्प्युटरला, टॅब्लेटला तसेच डेटा ज्यांच्यामध्ये सेव्ह करून ठेवणार आहे. त्याठिकाणी पासवर्ड असणे आवश्यक आहे.

३. पासवर्डमध्ये कमीत कमी ९ ते १० अक्षरे असावी.

४. यात २ लहानअक्षरे, २ मोठीअक्षरे, २ आकडे, २ रिकाम्याजागा, 2 स्पेल करेक्टर ( !@#$%^& ) असा एकत्रित स्ट्रॉंग पासवर्ड तयार करावा.

५. पासवर्ड नियमितपणे बदलत रहावा. आवश्यकता असल्यास पासवर्ड मॅनेजर अँप वापरले तरी चालेल.

६. पासवर्ड सहजपणे लक्षात राहावं म्हणून एकादे गाणे, म्हणीचे पहिले अक्षर एकत्र केले तरी चालेल.

७. पासवर्ड कुठेही सेव्ह करून ठेवू नये, कोणत्याही कागदावर लिहून ठेऊ नये.

८. पासवर्ड कोणत्याही प्रकारच्या शब्द कोषामधील नसावा.

९. पासवर्ड तुमचा लक्षात राहिल असाच ठेवा.

१०. जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर कसा प्रकारे रिकव्हर करता येते याचे सर्वं पर्याय पाहावे.

११. पासवर्ड कोणाच्याही लक्षात येणार नाही व पटकन तुम्ही टायपिंग करत असताना पाहिला तरी लक्षात येणार नाही असा असावा .

१२. पासवर्ड हा ऑटोमॅटिक सेव्ह होणार नाही याची काळजी घ्यावी.

१३. ई-मेलमध्ये अथवा मेसेजमध्ये सहजपणे तुमची व्यक्तीगत माहीती चोरण्यासाठी तुम्हाला एक खरी वेबसाईट सारखी बनावट वेबसाईट सांगितले जाऊन तुमचा पासवर्ड चोरला जाऊ शकतो.

१४. पासवर्ड टाईप करताना त्यावर हात झाका आणि पासवर्ड टाका.

(तन्मय दीक्षित,  सायबर फॉरेन्सिक तज्ञ, नाशिक)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!