जिओनी एफ १०९ ची घोषणा

0
आताच्या काळात मोबाईलच्या व्यापरात अत्यंत मंदीचे सावट निर्माण झाले आहे. या काळात जिओनी कंपनीने आपला जिओनी एफ १०९ हा स्मार्टफोन आंतराष्ट्रीय बाजारपेठेत लॉंच करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकृत सुत्रांनी सांगीतले आहे.

जिओनी एफ १०९ या मोबाईलची किंमत ही इतर मोबाईच्या तुलनेत अत्यंत कमी असून मिड रेंज मध्ये उपलब्ध होणार आहे. लॉंच होणार्‍या या मोबाईलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

तसेच मोबाईलमध्ये मीडियाटेक एमटी३७३७ हे प्रोसेसर बसविण्यात आले असून मोबाईची रॅम ही तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज हे १६ जीबी आहे. त्याचप्रमाणे मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची अद्यावत सुविधा मोबाईल मध्ये प्रदान करण्यात आली आहे.

कंपनीने तयार केलेला हा स्मार्टफोन अँडड्रॉईडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर जिओनी कंपनीचा अमिगो ४.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तसेच मोबाईल मध्ये सुमारे २६६० मिली अँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे जिओनी एफ १०९ या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यातज आला आहे.

तसेच यामध्ये ड्युअल सीमकार्डची सुविधा असणार्‍या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी नविन फिचर्स यामध्ये देण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे जिओनी एफ १०९ हे मॉडेल येत्या काही महिन्यात ते लॉंच होणार असल्याचे कंपनीच्या सुत्रांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*