गुगल ग्लास बाजारपेठेत लॉंच

0
व्यापारात किंवा दैनदिन व्यवहारा वापरण्यासाठी गुगलने नवीन गुगल ग्लास या उपकरणाची आवृत्ती सादर केली आहे. या ग्लासचा वापर हा व्यावसायात व उद्योगांध्ये करता येणार आहे. काही वर्षांपूर्वी गुगल ग्लास या उपकरणाने नागरीकांमध्ये प्रचंड उत्सुक्ता निर्माण झाली होती.

परंतू त्यावेळी या उपकरणाला परदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच सुरक्षेबाबतच्या विषयांमुळे अनेक देशांमध्ये या उपकरणाबाबत सावधगीरी बाळगण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुगलने आपले गुगल ग्लास हे प्रॉडक्ट बाजारपेठेतून मागे घेण्याची घोषणा करुन ते मागे घेतले होते. यामुळे गुगलवर एका प्रकारे नामुष्की ओढावली होती. परंतू गेल्या काही महिन्यांपासून गुगल ग्लास नवीन स्वरूपात बाजारपेठेत दाखल होणार असल्याची चर्चा बाजारपेठेत रंगली होती.

या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले असून गुगल ग्लास उपकरणाला गुगल ग्लास एंटरप्राईज एडिशन या नावाने हे उपकरण लॉंच करण्यात आले आहे.

गुगल ग्लास हे उपकरण औद्योगिक व व्यावसायिक वापर करण्यासाठी या उपकरणाला विकसीत करण्यात आले असून यामतध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री वापरण्यात आली आहे. या उपकरणाचा वापर हा यापूर्वी सॅमसंग, जनरल इलेक्ट्रीक, डीएचएल या सारख्या नामांकीत कंपन्यांमध्ये केला जात आहे.

परंतू आता इतर अन्य कंपन्यांमध्ये वापरता यावे यासाठी या उपकरणाची निर्मीती करण्यात आली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गुगलने तयार केलेल्या नवीन आवृत्तीमध्ये पुर्वीच्या आवृत्तीपेक्षा बदल करण्यात आले असून ही पुर्वीच्या आवृत्तीपेक्षा वजनाने कमी जड आहे.

तसेच तीचा वापर हा अत्यंत सुलभ असून अद्यात फिचर्सने सज्ज आहे. त्याचप्रमाणे वाहतूक, आरोग्य, उत्पादन आदी क्षेत्रांमधील कर्मचार्‍यांना अनेकदा रिअल टाईम मार्गदर्शनाची आवश्यकता त्याला भारत असते. मात्र नेमक्या याच वेळी गुगल ग्लासमधून करण्यात येणारी शुटींग पासून संबंधीत कर्मचार्‍याला तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळू शकते.

LEAVE A REPLY

*