रोटरी मिडटाऊनचा ई-लर्निंगसह आरोग्याच्या प्रश्नांवर भर

0

जळगाव |  प्रतिनिधी : समाजसेवा हीच ईश्‍वरसेवा असे बिद्र वाक्य घेवून रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनतर्फेे गेल्या ३२ वर्षांपासून अनेक समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जात असते.

हा वसा पुढे नेत रोटरीतर्फे यंदा देखील विविध रोटरी मिडटाऊनतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये ई-लर्निंगसह महिलांच्या आरोग्याच्या विषयांवर अधिक भर राहणार आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेची एक शाळा दत्तक घेवून त्या शाळेचा सर्वांगिंण विकास व शहरातील एका चौकाचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षा डॉ. अर्पणा मकासरे यांनी व्यक्त केला आहे.

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन हे शहरातील गरजूंसाठी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याबाबतच्या विविध विषायांवर सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करीत आहे. दरम्यान गेल्यावर्षी रोटरी मिडटाऊनतर्फे जिल्ह्यातील आदिवासी भागात व पाड्यांवर आरोग्य शिबीर घेण्यात आले होते.

या शिबीरात सुमारे १ हजार नागरीकांच्या आरोग्य तपासणी करुन त्यांना एका आठवड्याची मोफत औषधे वाटप करण्यात आली होती.

तसेच जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात नगग्रह मंगळ मंदिराच्या परिसरात राहत असलेल्या गरजूंना रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनकडून २ हजार जणांना कपड्यांचे वाटप करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शहरातील शाळांमधील अंध विद्यार्थ्यांसोबत रोटरीतर्फे दिवाळी साजरी करण्यात होती.

शहराची दैनंदिन साफसफाई करणार्‍या कामगारांना कामावेळी पाणी मिळत नसल्याने तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना पिण्याच्या पाण्याची बाटली, हात धुण्यासाठी साबण व रुमालाचे वाटप करुन त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला होता.

दरम्यान रोटरी मिडटाऊनतर्फे शहरातील शाळांमध्ये सध्याच्या काळात निर्माण होणार्‍या दातांच्या समस्येंबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करुन त्यांना टूथ पेस्टचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

रोटरीची क्लब जळगावची कार्यकारणी

अध्यक्ष डॉ. अपर्णा मकासरे, मानद सचिव डॉ. उषा शर्मा, प्रेसिडेंट इलेक्ट किशोर सुर्यवंशी, आय.पी.पी. श्रीकांत वाणी, उपाध्यक्ष छाया पाटील सहसचिव सुरेखा शिरूडे, कोषाध्यक्ष शेखर प्रभुदेसाई, सार्जंट ऍट आर्मस शैलेंद्र चिरमाडे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.सुमन लोढा, दिलीप गांधी, डॉ.चंद्रकांत कोतकर, डॉ.के.सी.पाटील, डॉ.प्रकाश चित्ते, विनोद मल्हारा, डॉ.देविदास सरोदे, डॉ.अभिनय हरणखेडकर, सुनंदा लाठी, रमेशचंद्र जाजू आणि सल्लागार म्हणून आनंद खांबेटे, प्रकाश चौबे, शंकरलाल पटेल, लिलाधर चौधरी, अनिल अग्रवाल, डॉ.रविंद्र महाजन यांचा समावेश आहे.

रोटरी मिडटाऊनचे व्हीजन

* भविष्यातील पिढी निरोगी रहावी व पैसे अभावी महिलांना गर्भवती असतांना तपासणी व मार्गदर्शन मिळावे. तसेच गर्भसंस्काराविषयी माहिती मिळावी या हेतूने वर्षभर विनामुल्य तपासणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच गर्भवती महिलांना रक्तगट, साखर, लघवी व हिमोग्लोबिन यांची तपासणी अल्पदरात करण्यात येणार आहे.

* बहिण भावाच्या प्रेमाचा दिवस मानल्या जाणारा रक्षाबंधन या सणानिमीत्त रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनतर्फे शहरातील बालसुधारगृहात रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बालसुधार गृहातील मुली मुलांना राखी बांधून हा सण उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. राखी बांधलेल्या आपल्या बहीणीला भेट वस्तू ही रोटरी क्लबतर्फे देण्यात येणार असून यावेळी २० वृक्षांची लागवड देखील याप्रसंगी करण्यात येणार आहे.

* मेकईन इंडिया या योजनेतर्ंगत बालसुधारगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे शिक्षण मिळावे यासाठी हार्डवेअर नेटवर्कींग याचे तीन महिन्याचे शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये बालसुधारगृहातील एकूण दहा विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शहरातील इतर गरजू विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात या शिबीराचे प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस असून त्यांना ई-लर्निंग किटचे वाटप करण्यात येणार आहे.

* दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनासाठी रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनतर्फे पुढच्या महिन्यात दुर्धर आजारांसाठी मेगा होमीओपॅथीक आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. शिबीरात राज्यातील नामवंत होमीएपॅथीक डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना एका आठवड्याच्या औषधी मोफत देण्यात येणार आहे.

* मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे व त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा याकरीता रोटरी मिडटाऊनतर्फे तीन वर्षासाठी मनपाची एक शाळा दत्तक घेणार आहे. तसेच येत्या काही वर्षातच शाळेचा विकास करुन विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी सुविधा देवून शाळेचा विकास करण्याचा संकल्प कल्बने केला आहे.

* रोटरी मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा स्व. स्वरुप लोढा यांच्या स्मरणार्थ क्लबकडून शहरातील एक चौक दत्तक घेतला जाणार आहे. तसेच दत्तक घेतलेल्या त्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रोजचे होणारे अपघात कमी व्हावे यासाठी व नागरीकांमध्ये रोडअपघाताविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

* महिलांच्या सक्षमिकरणासाठी रोटरी मिडटाऊनतर्फे भावस्पर्श काऊनसिलींग सेंटर यांच्याकडून महिला सक्षमिकरण मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार व त्यांचा होणारा मानसिक छळापासून बचाव करुन त्यांना सक्षम करण्यासाठी शिबीरात मार्गदर्शन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*