सेल्फी जीवावर बेतली ढोली येथील तरुणाचा इंद्रायणीत बुडून मृत्यू

0
पारोळा |  श.प्र. : तालुक्यातील ढोली येथील अतुलकुमार दशरथ पाटील (२५) यांचा पुणे जिल्ह्यातील देहू येथल इंद्रायणी नदीत सेल्फी काढतांना तोल जावुन पडल्याने परण पावल्याची दुर्देवी घटना  उघडकीस आली.

अतुल याने पारोळा येथे प्राथमिक शिक्षण घेवुन पुढील उच्च शिक्षणासाठी पुणे गेलेला होता.  दि. २९ रोजी शेवटचा पेपर दिल्यानंतर दुपारी ४ वाजता  देहू येथील काठेवाडी बाग जवळील इंद्रायनी नदीवर मित्रांसमवेत सेल्फी काढीत असतांना त्याचा  तोल जावुन पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेला.  ढोली येथील आर एम पाटील यांचा मुलगा त्याच्या महाविद्यालयात प्राध्यापक आहे. त्यांनी तात्काळ पोलीस पाचारण करुन अतुलचा शोध सुरु केला\

त्याचा मृतदेह घटनास्थळापासुन सुमारे ७ ते ८ की.मी.वर दि. ३० रोजी  दुपारी १२ वाजता सापडला. त्याचे पुणे येथे शवविच्छेदन करुन दि. ३० रोजी रात्री शव ढोली ता.पारोळा येथे आणण्यात येवुन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान अतुला हा दशरथ पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची हि दुर्देवी बातमी ढोली गावात आल्यानंतर गाव परिसर सुन्न झाले . गावात एकही चुल पेटली नाही. अतुल हा ढोली येथे आषाढी एकादशीला यात्रोत्वाला येवुन पुन्हा पुणे येथे गेलेला होता. तो फारच हुशार व मनमिळावु होता. त्याने पुणे विद्यापीठात इंजिनिअरींगला २०० पैकी १९७ गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला होता.

त्याच्या काका सदाशिव पाटील यांचा एकुलता एक मुलगा मयुर याचाही तरवाडे चाळीसगाव नजिक चार वर्षांपुर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनतर हि दुसरी दुर्देवी घटना घडल्याने संपुर्ण परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्यासोबत असणार्‍या त्याच्या मित्रांना पुणे पोलिसांनी अकस्मात की घातपात या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्या पश्‍चात आई-वडील,बहीण असा परिवार असुन एलआयसी एजंट राजेंद्र शालीग्राम पाटील यांचा तो पुतण्या होता.

LEAVE A REPLY

*