Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रुळातील फटी शोधणारे स्वयंचलित उपकरण

Share
जळगाव । प्रतिनिधी :  भारतात दळणवळणाच्या साधनांत रेल्वेचा फार मोठा वाटा आहे. रेल्वे अपघात मुख्यत्वे रेल्वे रुळातील फटींमुळे होतात. हे अपघात टाळण्यासाठी एसएसबीटी अभियांत्रिकी कॉलेजेच्या इलेक्ट्रानिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी एक स्वयंचलित उपकरण बनविले आहे. यात लावलेल्या कॅमेर्‍यामुळे रेल्वे इंजिन समोरील घडामोडी त्या यंत्रात नमूद केलेल्या रेल्वे स्थानकावरुन पाहता येणार आहे.

तसेच रेल्वे रुळांना सतत पारखण्यात येणार असून रुळातील अत्यंत बारीक फट जी साध्या डोळ्यांना दिसणे अशक्य असते. ती सुध्दा शोधता येणे शक्य होणार आहे. त्या ठिकाणाचे लोकेशन जवळच्या रेल्वेस्थानकाला पाठविले जाईल, अशी सुविधा या यंत्रात आहे.

रेल्वे रुळातील फटी शोधणारे स्वयंचलित उपकरण बनविण्यासाठी एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्टॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या अनघा चौधरी, प्रिया मंडल, करिश्मा पाटील, घनशाम मटकर या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली असून त्यांना विभागप्रमुख प्रा.डॉ. एस.आर. सुरळकर, प्रा. ए.एच.करोडे व प्रा. ए.सी.वाणी यांचे मार्गदर्शन लाभले. हे स्वयंचलित उपकरण इतर उपकरणांच्या तुलनेत बनविण्यास व वापरास सोपे आहे. यास वापरण्यासाठी फक्त 12 व्होल्ट बॅटरीची गरज भासते.

लाईव्ह लोकेशन पाहण्यासाठी उपकरणाचा उपयोग

गाडी सध्या कुठे आहे याचा लाईव्ह व्हिडीओ बघण्याची सुद्धा सोय या उपकरणात करण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी यात रासबेरी पाय कॅमेरा व्हि. 2 हे मॉड्युल वापरले आहे. या कॅमेर्‍याने अत्यंत बारीक वस्तू देखील पाहू शकतो. या कॅमेर्‍याचे कनेक्शन ब्लिंक या सॉफ्टवेअरला देण्यात आले आहे. ब्लिंक हे सॉफ्टवेअर प्लेस्टोअर वर मोफत उपलब्ध आहे. ज्या जागेवर रुळात फट असेल त्या जागेचे अचुक निदान करण्यासाठी जीपीएस व जीएसएम मॉड्युल वापरले आहे. हे त्या जागेचे लाँगीड्युड व ल्यॅटीट्युड शोधुन काढते.

स्वयंचलित उपकरणात या तंत्रज्ञानाचा वापर
हे स्वयंचलित उपकरण तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे आधुनिक असे रासबेरी पाय 3 ए+ मॉड्युल वापरले आहे. याचे वैशिष्टय म्हणजे यात कॅमेरा तसेच वायफाय व इतर घटक जोडण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. ज्यामुळे जोडणी सहज व सोपी होते. रेल्वे रुळातील फटी शोधुन काढण्यासाठी इन्फ्रारेड सेंन्सर वापरण्यात आले आहे.

ज्याची अचुकता ही अल्टासोनीक सेंन्सर पेक्षा जास्त असते व किंमत देखील कमी असते. जर रुळात फट असेल तर ईमेल वर तसा मेसेज येतो. ज्यात त्या जागेचे ठिकाण दिलेले असते व आपण मॅपद्वारे ते पाहू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!