Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

सदस्य बैठकीला नाही म्हणून विवरे बुद्रूक ग्रामस्थांनी सभा केली तहकुब !

Share

रावेर|प्रतिनधी : विवरे बुद्रूक (ता.रावेर)येथील ग्रामसभेत १५ पैकी १० सदस्य अनुपस्थित असल्याने,आजची ग्रामसभा ग्रामस्थांनीच तहकूब केली आहे.तर या कारणाने तालुक्यात ग्रामसभा तहकूब होण्याची हि पहिलीच वेळ आहे.

येथील ग्रामसभा साडे नऊ वाजता ध्वजारोहण आटोपल्यावर ग्रामपंचायती समोर सरपंच सुनिता सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी सभेसाठी लागणारा कोरम पूर्ण होवून देखील,सदस्य सभेत हजर नाही म्हणून शनिवारची ग्रामसभा तहकूब करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली,यावेळी सरपंच सुनिता सपकाळ,उपसरपंच रवी वासनकर, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य जनार्दन पाचपांडे,वासू नरवाडे,भागवत महाजन हे उपस्थित होते.

ग्रामविकास अधिकारी व्ही.जी पवार यांनी कोरम पूर्ण झाला आहे.असे सांगून ग्रामसभा सुरु करण्यास सुरवात करताच यावेळी बाबुराव पाटील व नरहरी पाटील विकास पाटील यांनी आम्हाला प्रत्येक प्रभागात सदस्यांनी काय कामे केली आहे.

याबाबत विचारणा करायची आहे.मात्र ते यावेळी नसल्याने,आमचे समाधान होवू शकत नाही,त्यापेक्षा सभा तहकूब करावी अशी मागणी केल्याने सदरील सभा तहकूब केली आहे.यावेळी ग्रामस्थ  उपस्थित होते.

याआधी सरपंच सुनिता सपकाळ यांच्या हस्ते ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विवरे बु व विवरे खुर्द येथील ग्रामस्थ,पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!