Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

आयएमआरच्या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्त्या

Share

जळगाव । प्रतिनिधी :  मू.जे महाविद्यालय परिसरात रुमवर राहणार्‍या व आयएमआर कॉलेजमध्ये बीबीएच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि.29 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. रुममधील सहकारी मित्राच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजस नंदकिशोर बारी वय 19 असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील तेजस नंदकिशोर बारी हा आयएमआर कॉलेजमध्ये बीबीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. मयत तेजस बारी त्याचा मित्र दीपक नंदू महाजन व सौरभ नंदकिशोर राजपूत हे तिघे एम.जे कॉलेज परिसरातील पद्मालय हाईटस येथे रुममध्ये भाड्याने राहत होते. दीपक महाजन हा रेडीमेड कपड्याच्या दुकानावर कामाला आहे. तर सौरभ राजपूत हा रायसोनी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

दि.29 रोजी रात्री 9.30 वाजता दीपक महाजन हा कामावरून खोलीवर आला. याचवेळी सौरभ हा त्याच्या दुसर्‍या मित्राकडे अभ्यासासाठी गेल्याने रुमवर तेजस बारी हा एकट्याच बसलेला होता. त्यानंतर दीपक याने तेजस याला जेवणासाठी विचारले असता, त्याने भूक नसल्याचे सांगत जेवणाला जाण्यास नकार दिला होता. रात्री 11.30 वाजता जेवण करून दीपक महाजन हा रुमवर आल्यानंतर त्याला रुमचा दरवाजा आतून लावलेला दिसला. त्यानंतर तेजस याने आत्महत्या केल्याचे समजून आले.

पोलिसांसह कुटुंबियांकडून तेजसच्या रुमची घेतली झडती

तेजस याने आत्महत्या केल्याचे दिसून येताच दीपक महाजन याने रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोहेकॉ. विनोद शिंदे यांच्यासह कर्मचार्‍यांनी याठिकाणी धाव घेवून त्याच्या कुटुंबियांना फोन करून घटना कळविली. तेजसचे कुटुंबिय आल्यानंतर त्याचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. तेजस याने केबलच्या दोरीने पंख्याला बांधून गळफास घेतला होता. त्यानंतर कुटुंबियांसह पोलिसांनी तेजस याच्या संपूर्ण खोलीची झडती घेतली. परंतु सुसाईड नोट मिळून आली नाही.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

तेजस याच्या आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान प्राथमिक तपासधिकारी पोहेकॉ. विनोद शिंदे यांनी तेजसचा मोबाईल हस्तगत केला असून सीडीआरवरून त्याचे शेवटी कोणाकोणासोबत बोलणे झाले हे तपासण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!