पाडळसे येथे कानबाई-रानुबाई उत्सव साजरा

0

पाडळसे, ता.यावल | वार्ताहर : संपुर्ण महाराष्ट्रात तसेच मुख्यतः खान्देशाचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिध्द असा कानुबाई रानुबाई उत्सव (रोठ) पाडळसेसह परिसरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.

प्रत्येक वर्षाच्या श्रावण महिन्याच्या नागपंचमी नंतर येणार्‍या पहिल्या रविवार कानुबाई रानुबाई (रोठ)चा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यानुसार पाडळसे येथील रमेश कडु लोहार यांच्याकडे सुमारे १२५ वर्षाची परंपरा जोपासली जात आहे.

त्यानुसार या कुटुंबाकडुन अमावस्याच्या दिवशी सुरूवातीला धान पेरून उत्सवाची सुरूवात केली जाते. ते याप्रमाणे दोन कोर्‍या टोपली घेऊन त्यात मका, गहू, बाजरी याचे आंब्याच्या झाडा खालील माती घेऊन ती माती कोर्‍या टोपली मध्ये गाईचे शेण व माती मडून त्यात हे धान्य पेरले जाते, नंतर सलग सात दिवस या टोपलीतल्या धान्याला पाणी हवा सूर्यप्रकाश दाखवला जातो.

या परंपरेला अशी आख्यायिका आहे की, ज्या प्रमाणे श्रावणात शेतकरी धान्य लावतो त्या प्रमाणे सर्वांना सुख समृद्धी लाभो याची भावना करून हे धान्य लावले जाते, नंतर येणार्‍या नागपंचमी नंतर येणार्‍या पहिल्या रविवारी कानुबाई रानुबाईचे मुर्तीरूपी स्थापना केली जाते.

रमेश लोहार यांनी सांगितले की, आमचे पूर्वजांकडे पुर्वी शेती कामासाठी बैलगाडी जोडी असायची एकदा आमच्या एका पूर्वजांचे बैलजोडी जंगलात कोठेतरी निघुन गेली खूप शोधून सुध्दा ती जोडी मिळत नव्हती म्हणून गावा शेजारील गावात त्या समई कानुबाई रानुबाई उत्सव साजरा होत होता, तेव्हा आमच्या पूर्वजांनी तेथे नवस केला कि माझी बैल जोडी जर मला मिळाली तर मी माझ्या परीवारात हा कानुबाई रानुबाई चा उत्सव साजरा करीन व लागलीच त्याच रात्री ती बैल जोडी आमच्या घरी आपोआप परत आली.

आशा पध्दतीने आमच्या परीवारात हा उत्सवास सुमारे १२५ वर्षापुर्वी सुरूवात झाली. आजपर्यंत अखंड हि उपासना आमच्या परिवारातील सर्वत्र केली जात आहे, तसेच अनेकांना आपले नवस बोलून आपल्या इच्छा या मातेसमोर पुर्ण केल्या आहेत असे सांगितले.

कसा होतो उत्सव

पंचमी नंतर येणार्‍या पहिल्या रविवार सकाळी परिसरातील स्त्रीया स्नान करून सकाळी पुरणपोळी, खीर, रशीचा नैवेद्य सकाळी सुर्य देवाला अर्पण करतात व राहिलेला नैवेद्य स्वताः ग्रहण करतात. नंतर कानुबाई रानुबाईची मुर्ती बनवुन त्याची विधीवत स्थापना केली जाते.

त्या नंतर संध्याकाळी जाड रोठ बनवून त्यावर कणकेचे दिपक पारंपरिक पद्धतीने वही गायन करून ज्योत लावली जाते. त्या नंतर रात्री उशिरापर्यंत वह्या गायन करून सकाळी गावात मुर्तीची मिरवणूक काढून परीसरातील नदी पात्रात विसर्जन केले जाते.

LEAVE A REPLY

*