बोलेरो विजेच्या पोलवर आदळून एक ठार : ४ जखमी

0
भुसावळ- तालुक्यातील कपिलवस्तू नगर (निंभोरा) येथील काही युवक बोलेरो गाडीने अजिंठा लेणी पाहण्यासाठी जात असतांा तालुक्यातील चोरवड येथील सबस्टेशन जवळ वळणावरील वीजेच्या खांबाला चारचाकी गाडीने ठोस दिल्याने चालकाचा मृत्यृ तर अन्य चौघे जखमी एक जण ठार तर चौघे जखमी झाल्याची घटना दि.३० रोजी सकाळी ७ वाजता घडली.
अपघातात वीज खांबाचे नुकसान होऊन परिसरातील ५५० हून अधिक कृषि पंपांचा विज पुरवठा खंडीत झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कपिलवस्तू नगर (निंभोरा) येथील काही युवक रविवार असल्याने सकाळी अजिंठा येथे पर्याटनासाठी बोलेरो (एमएच १९वाय ५५१४) या गाडीतून जात असताना तालुक्यातील चोरवड येथील वीज कंपनीच्या सबस्टेशनच्या वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण हुकल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबावर आदळून झालेल्या अपघातात चालक रवींद्र उद्धव कांबळे (वय २२, रा, कपिलवस्तू नगर ता. भुसावळ) याच्या सह पाच जण गंभीर जखमी झालयाची घटना घडली.
घटनेनंतर जखमींना तात्काळ १०८ या रुग्णवाहिणे डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले तेथे उपचारादरम्यान रवींद्रचा मृत्यू झाला. अन्य चौघांवर उपचार सुरु आहे.
 दरम्यान, सायंकाळी मयत रवीद्र याच्यावर सायंकाळी कपिल वस्तूनगरात अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेने गवातात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पो.स्टे.चे एएसआय शशी चौधरी, हे.कॉं. रियाज शेख यांनी घटनस्थळी पोहचून वाहनाचा पंचनामा केला.
शहरातील क्रेन घटनास्थळी बोलवून रस्त्याच्या खाली पलटलेली बोरेलो गाडी रस्त्यावर काढून नवीन तालुका पो.स्टेत आण्यात आले. दरम्यान घटनेनंतर चोरवड गावातील नागरिकांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना मदत केली.याबाबत सायंकाळपर्यंत  गुन्ह्यची नोंद नव्हती.
 ५५० कृपिपंपांचा विजपुरवठा खंडीत
 दरम्यान, बोलोरो वाहनाने वीज खांबाला ठोस दिल्याने खांब वाकला असून इलेक्ट्रीक तार तुटली आहे. यामुळे वीज कंपनीच्या कुर्‍हा एजी क्षेत्रातील कुर्‍हा, चोरवड, खेडी शिवारातील ५५० कृषि पंपांसह हॉटेलस्स, कंपनी, कॉटन जीन, मिल व पेट्रोलपंपांचा विज पुरवठा खंडीत झाला आहे.
यामुळे व्यवसायिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.  रविवार असल्याने वीज कंपनीच्या संबंधित ठेकेदाराचे मजूर सुटीवर असल्याने सोमवर दि. ३१ जुलै रोजी परिसरातील खंडीत वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ठेकेदाराकडून काम सुरु करण्यात येणार असल्याने सूत्रांनी सांगितल.

LEAVE A REPLY

*