कारचे रुपांतर केले ऑफिसमध्ये

0
लंडन| वृत्तसंस्था  : घर शहराच्या एका टोकाला व नोकरीचे ठिकाण दुसर्‍या टोकाला असलेल्या लोकांना ऑङ्गिस गाठण्यासाठी रोज प्रदीर्घ प्रवास करावा लागतो. वाहतूक कोंडी व अन्य समस्यांमुळे हा प्रवास अनेकदा नकोसा वाटतो, पण अशा लोकांची ही चिंंता संपली आहे. आता ते आपल्या कारमध्येच ऑङ्गिसचे सगळे काम करू शकतात व तेेही ऑङ्गिसमध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या सुविधांसह.

वाय-ङ्गाय, इंटरनेटपासून आयपॉड, टीव्ही, ङ्गोनसह स्पीकरपर्यंत सगळ्यात सुविधा या कारमध्ये असतील. एवढेच नव्हे तर ऑङ्गिसमध्ये असलेल्या प्रत्यके नेटवर्कचे कनेक्शनही या कारमध्ये असेल. त्यांची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ते सहज नियंत्रित केले जाऊ शकतात.

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी बेंटलीने ही कन्सेप्ट काढली आहे. त्यांनी कारलाच ऑङ्गिसचे रुपडे दिले आहे. ही कार अत्याधुनिक ऑङ्गिसप्रमाणे बनविण्यात आली आहे. या कारची स्टिअरिंग बरोबर मधोमध असेल अशी तिच्या ड्रायव्हिंग सीटची रचना करण्यात आली आहे. आर्म रेस्ट म्हणजे हात ठेवण्याच्या सीटच्या दोन्ही बाजूस बनविलेल्या उशीसारख्या आधारावर ङ्गोन ठेवला जाऊ शकतो.

या कारमध्ये एक टीव्ही स्टिअरिंगच्या वर तर दोन टीव्ही मागच्या सिटाच्या बाजूस लावलेले आहेत. या ऑङ्गिस कम कारची किंमत अद्याप सांगितलेली नसली तरी तिच्यासाठी किमान दीड कोटी रूपये मोजावे लागतील, असा अंदाज आहे.

एका पाहणीनुसार, ब्रिटनमध्ये ऑङ्गिसमध्ये काम करणारांचे वर्षातील किमान पाच आठवडेे प्रवासातच जातात. अमेरिकेतही प्रत्येक कामगार रोज ५० मिनिटे रस्त्यावर घालवतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही कार अतिशय उपयुक्त ठरू शकते. .

LEAVE A REPLY

*