प्लास्टिक कचर्‍याच्या समस्येवर त्याने शोधला उपाय

0
टोरंटो | वृत्तसंस्था :  प्लास्टिक कचर्‍याची समस्या संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरली आहे. दरवर्षी तयार होणार्‍या सुमारे ३० लाख टन प्लास्टिकच्या कचर्‍याची विल्हेवाट नेमकी कशाप्रकारे लावावी, हे अद्याप कुणाच्याही लक्षात आलेले नाही.

मात्र कॅनडातील रॉबर्ट बेजाऊ नावाच्या एका उचापत्या इसमाने प्लास्टिकचा योग्य प्रकारे वापर करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. तो प्लास्टिकच्या जुन्या बाटल्यांचा वापर करून चक्क इमारत बांधतो.

सुमारे ४० हजार बाटल्यांचा वापर करून त्याने घराच्या रचनेच्या अङ्गलातून कलाकृती साकारल्या आहेत. रॉबर्टकडून बांधल्या जात असलेल्या इमारतींचे निर्मिती कार्य चालूवर्षाच्या अखेरपर्यत पूर्ण होईल.

त्यानंतर त्याचा हॉलीडे रिसॉर्टच्या रुपात वापर केला जाईल. रॉबर्ट सांगतो की, काही दिवसांपूर्वी त्याने एका वॉलंटियर प्रोग्राम सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याचे लक्ष तिथे चहुबाजूस पसरलेल्या प्लास्टिकच्या कचर्‍यावर गेले. त्यानंतर त्याच्या मनात प्लास्टिक कचर्‍याची समस्या दूर करण्याच्या दिशेने काहीतरी काम करायला हवे, असा विचार चमकून गेला.

तेव्हापासून तो या कामाला लागला आहे. प्लास्टिकच्या वाढत्या कचर्‍याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने जुन्या बाटल्यांपासून त्याने मध्यकालीन किल्ल्यासारखी इमारत तयार केली आहे. अर्थात त्याचा हा पहिला प्रयत्न बराच छोटा आहे, मात्र कौतुकास्पद आहे.

या इमारतीचा सांगाडा बनविण्यासाठी लोखंड व तारेचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर त्यावर सीमेंटचा थर चढविला जातो. ही इमारत बनविण्यामागे प्लास्टिक कचर्‍याच्या गंभीर समस्येबाबत लोकांना जागृत करणे हा रॉबर्टचा हेतू आहे. लोकांना प्लास्टिकच्या बाटल्यांपासून इमारत बांधण्याचे कौशल्य शिकविण्यासाठी एक कोचिंग सेंटर सुरू करण्याचाही त्याचा इरादा आहे.

LEAVE A REPLY

*