भुसावळात महिलेचा संशयास्पद मृत्यू

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  मनोरुग्ण सवत व नणंदेला घरात राहू न देण्याच्या पत्नीच्या तागद्यावरुन पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे व याच दरम्यान विवाहितेला फिट आल्याचे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि.२८ रोजी येथील पांडूरंग टॉकीज भागातील लोहारवाडा परिसरात घडली.

याबाबत बाजारपेठ पोलिसांनी पतीस ताब्यात घेवून अ.मृ.ची नोंद केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील लोहारवाडा भागातील विवाहीता उषा अनिल साळुंखे (वय३५) हीस पती अनिल साळुंखे याने केलेल्या मारहाणी पश्‍चात सकाळी ११ वाजता आंघोळ करतांना फीट आल्यानंतर मुलाने तीला घरात झोपविल्यानंतर काही क्षणात महिलेचा घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता घडली.

दरम्यान, महिलेचा सावत्र मुलगा प्रवीण अनिल साळुंखे याने मृत महिलेस येथील मानवतकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल, एपीआय मनोज पवार, पीएसआय मनोज ठाकरे, संकेत झांबरे, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, संदीप चव्हाण, राहुल चौधरी, पीएआय प्रल्हाद पाचपोळ, संजय भदाणे, महिला कॉन्स्टेबल संगीता चौधरी, भाग्यश्री चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली.

तसेच मयताचा पंचनामा केला. दरम्यान घटनास्थळी डॉ. राजेश मानवतकर यांना बोलावून मयत महिलच्या मृत्यू बाबात प्राथमिक माहिती घेण्यात आली.याबाबत बजारपेठ पोलिसांनी पती अनिल यास लाकडी दांड्यासह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

तीच्या पश्‍चात पती , सवत, नणंद, यासह स्वत:चे सारिका (वय२) व मुलगा सुरज (४ महिने) अशी दोन तर सावतीची दोन मुल असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*