जिल्हा बँकेच्या शेेंदुर्णी शाखेला शेतकर्‍यांनी ठोकले कुलुप

0
शेंदुर्णी, ता. जामनेर, |  वार्ताहर : संतप्त शेतकर्‍यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला सकाळी टाळे ठोकुन तोडगा निघेपर्यंत गेटजवळच ठिय्या मांडून बसले.

माजी जि.प. सदस्य संजय गरुड यांच्या २० मिनिटांच्या प्रयत्नाने संतप्त शेतकर्‍यांची समजुत काढून प्रशासनाचा पाठपुरावा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याने शेतकर्‍यांनी शाखेचे कुलुप उघडले.

नाबार्डच्या नियमानुसार शेतकर्‍यांना सोसायटीचे जिल्हा बँकेमार्ङ्गत दिले जाणारे कर्ज रकमा रुपे डेबीट कार्डच्या माध्यमातून स्वीकारणे सक्तीचे केल्याने सोसायटीच्या कर्ज रकमा खात्यावर जमा असुन देखील शेतकर्‍यांच्या हातात पैसा मिळत नसल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत.

सकाळी ११ वाजता बँकेच्या शाखेला टाळे ठोकून शाखेतून कर्ज रकमा काढू देणार नाही, तोपर्यंत कुलुप उघडणार नसल्याचा पावित्रा शेतकर्‍यांनी घेतल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

जिल्हा बँकेला टाळे ठोकल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरताच सर्व शेतकर्‍यांनी एकच गर्दी केली आणि ठिय्या आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्याने बँक व्यवस्थापक यांनी वरीष्ठ अधिकर्‍यांना कळविले असता रुपेडेबीट कार्डला सध्स्तिरी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी असमर्थ असल्याचे दिसून आले.

संजय गरूडांच्या मध्यस्थिने आंदोलन मागे

संतप्त शेतकर्‍यांनी येथिल जिल्हा बँकेच्या शाखेला टाळे ठोकल्याचे वृत्त कळताच माजी जि.प. सदस्य संजय गरुड यांनी शेंदुर्णी शाखा गाठली.

प्रशासनासोबत चर्चा करुन सर्व परीस्थीती जाणून घेतल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकर्‍यांची समजुत काढून स्वतः पाठपुरावा करुन कर्ज रकमा बँक खात्यातून काढता याव्यात, यासाठी प्रयत्न करून शेतकर्‍यांच्या संतप्त भावना प्रशासनापर्यंत पोहचविणार असल्याचे आश्वासन दिल्याने शेतकर्‍यांनी शाखेचे कुलुप उघडले.

जिल्हा महाव्यवस्थापकांचा मोबाईल बंद

सर्व घडामोडी सुरु असतांना जिल्हा बँकचे महाव्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांच्या उपलब्ध भ्रमणध्वनी क्रमांकावर शेतकर्‍यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणधनी बंद आल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला.

किसान कार्ड ऍक्टीवेट नाही

किसान क्रेडीट कार्ड दिले. परंतू, ते सिस्टीममध्ये ऍक्टीवेट झालेले नसल्याने तसेच बर्‍याच शेतकर्‍यांना एटीएम मशिनचा वापर करता येत नसल्याने ज्या शाखेचे एटीएम मशिन सुरु असेल तेथे जाऊन कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

*