वीजचोरांविरुद्ध मुख्य अभियंता रस्त्यावर : १६ आकोडे धारकांना पकडले

0
जळगाव |  प्रतिनिधी :  विजचोरांविरुध्दची मोहीम महावितरणने तीव्र केली असून खुद्द यासाठी जळगाव परिमंडळचे मुख्य अभियंता ब्रीजपालसींग कूंवरसींग जनवीर यांनी जळगाव ग्रामीण उप विभागातील पाथरी येथे अचानक भेट देवून १६ वीजचोर पकडले.

यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे कनिष्ठ अभियंता कुणाल महाजन (वावडदा) यांनी सांगितले. प्रथमच मुख्य अभियंत्यांनी रस्त्यावर येवून कारवाई केली आहे.

जळगाव परीमंडळचे मूख्य अभियंता श्री. जनवीर यांनी जळगाव ग्रामीण उप विभागातील पाथरी येथे अचानक भेट दिली. त्यात एकूण १६ वीजचोरांना पकडण्यात आले.विद्युत तारांवर आकोडे टाकून विजचोरी सुरु होती, असे श्री महाजन यांनी सांगितले.

मुख्य अभियंता श्री जनवीर यांचे आदेशानूसार व कार्यकारी अभीयंता यांचे मार्गदर्शना नूसार कनिष्ठ अभीयंता कुणाल महाजन यांनी कारवाई केली असून प्रत्येक महीन्यात अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

यामुळे वीजचोरांमध्ये घबराट निर्माण झाली असून त्यांचेविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. मूख्य अभीयंता जनवीर यांची एखाद्या गावात भेट देण्याची ही पहीलीच वेळ असून कर्मचार्‍यांमध्ये खूशीची लहर आली आहे.

ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व त्यांना लगेच रीतसर जोडणी देण्यात येईल व त्यांना महावितरणचे पूर्ण सहकार्य राहील, असे कनिष्ठ अभियंता कुणाल महाजन (वावडदा) यांनी सांगितले.

वीज ग्राहकांनी आकोडे न टाकता व कूठलाही आमीशाला बळी न पडता रीतसर विद्युत जोडणी घ्यावी, अन्यथा अशीच कारवाई करण्यात येईल.
– ब्रीजपालसींग कूंवरसींग जनवीर
मुख्य अभियंता, जळगाव परीमंडळ

LEAVE A REPLY

*