चोसाकाकडील ऊस उत्पादकांची थकीत रक्कम मिळावी : शेतकरी कृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
चहार्डी, ता.चोपडा, |  वार्ताहर  : शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.चहार्डी यांचेकडे सन २०१४/२०१५ मधील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे थकीत प्रतिटन ६०० /- रुपये रक्कम मिळावी यासंदर्भात त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी  शेतकरी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांना लेखी निवेदन देण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्र. ५०३९ /२०१६ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही होऊन चोपड़ा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांना २०१४-१५ च्या हंगामात ऊस पुरवठा केलेला होता,व शेतकर्‍यांचे ६०० रुपये प्रतिटन प्रमाणे कारखान्याकडे घेणे होते  ,त्यावेळी मा. साखर आयुक्त पुणे यांनी ३ जुलै २०१५ रोजी महसुल वसूली प्रमाणपत्र  जारी केले होते.

त्यानुसार ऑगस्ट २०१५ मध्ये जळगाव जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने चोपड़ा तहसिलदार यांनी साखर व् मोलसेस जप्त केले.सदर आदेश रद्द होणेेसाठी बुलढाणा अर्बन बँक,चोपड़ा यांनी व चोपड़ा शेतकरी साखर कारखाना चोपड़ा यांनी सहकार मंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्याकड़े स्थगनादेश मिळवनेसाठी अर्ज केला.

त्यावेळी चोसाकाने स्थगनादेश उठल्यास कारखाना सुरु होणे व् कारखान्यास नवीन कर्ज बँक उपलब्ध करून देणार असल्याने शेतकर्‍यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार मा. सहकार मंत्री यांनी दि. २६ आगस्ट २०१५ रोजी स्थगनादेश दिला.त्यानंतर अंदाजे ३१कोटी रुपयांचे साखर व् मोलसेस विकले गेले,त्यापैकी फ़क्त १३ कोटी शेतकर्‍यांना दिले व् उर्वरित पैसे बुलढाणा बँकेने त्यांचे कर्ज वसूल खात्यात जमा केले.बुलढाणा अर्बन बँकेने ना कारखाना सुरु करण्यास पैसे दिले ना शेतकर्‍यांना दिले.

अश्या प्रकारे फसवणूक झाल्याने ना इलाजास्तव शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालया च्या,औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली. त्याचा निकाल दि.१३ जुलै २०१७ रोजी लागला त्या नुसार सहकार मंत्री यांना अधिकार नसतांना किंवा सहानुभुति पुर्वक निर्णय न घेता फ़क्त कारखान्यास व बँकेस फायदा उठवता यावा यासाठी निर्णय घेतल्याचे न्यायालयाने म्हटले असून मंत्र्यांचा स्थगनादेश रद्द ठरवला.

त्यानुसार महसुली वसूली प्रमाणपत्रानंतर स्थगना देश उठवने व् बँकेने पैसे जमा करून घेणे ही कृती न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली असल्याने व् न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना कार्यवाही करणेस सांगितले.त्या प्रमाणे आज शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांनी प्रशासन उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांना भेटून निवेदन दिले.

बुलढाणा अर्बन बँकेने महसुली वसूली प्रमाणपत्रात नमूद केलेली रक्कम बुलढाणा अर्बन बँकेने कारखान्याकडे वर्ग करनेस व् कारखान्या स शेतकर्‍यांना ऊसाचे थकीत बिल देण्याचे आदेश द्यावेत ,यामुळे भविष्यात शेतकरी कारखान्यास उस पुरवठा करतील व् कारखाना सुरु होणेस व् बँकेचे कर्ज फेडण्यास मदत होईल.असे सांगून विनंती केली.

यावेळी चोसाका संचालक अड़.एस.डी.सोनवणे,माजी जि.प.सदस्य संभाजी पाटील,कॉंग्रेसचे डॉ.राधेश्याम चौधरी,अजित पाटील हजर होते.

LEAVE A REPLY

*