Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

आज ‘अभिजीत’ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भरणार अर्ज

Share

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या वेळी दिवस, तारीख आणि योग पाहण्याबरोबरच खास शुभ मुहूर्त काढला आहे. ज्योतिषांचा सल्ला मानत आज मोदी अभिजीत मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशीचा कोतवाल म्हणून प्रसिद्ध असेलले दंडाचे अधिकारी आणि कल्याण करणारे बाबा म्हणून मान्यता असलेल्या बाबा कालभैरवाचे दर्शन करणार आहेत.

पंतप्रधानपदी असताना भरणार अर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी वारणसी लोकसभा मतदारसंघामधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या वेळी ते पंतप्रधानपदावर असताना आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. सन २०१४ च्या निवडणुकीत मात्र पंतप्रधानांनी दिवस, तारिख आणि वेळ पाहिलेली नव्हती. तसेच ज्योतिषाचा सल्लाही घेतलेला नव्हता. या वेळी मात्र पंतप्रधानांनी ज्योतिषांचा सल्ला घेतलेला आहे.

अभिजीत मुहुर्तावर  अर्ज

वाराणसीच्या पंडितांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पंतप्रधानांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २६ एप्रिलचा दिवस निश्चित केला आहे. ज्योतिषांनी सांगितलेल्या खास अभिजीत मुहूर्तावरच ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रायफल क्लब येथे जिल्हा निवडणूक अधिकारी सुरेंद्र सिंह यांच्या समोर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!