Type to search

करकरेंचे सहकारी निवृत्त एसीपी रियाझ देशमुख साध्वीविरोधात रिंगणात

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

करकरेंचे सहकारी निवृत्त एसीपी रियाझ देशमुख साध्वीविरोधात रिंगणात

Share

नवी दिल्ली :  मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांची प्रतिमा कथित रुपात मलीन झाल्याच्या कारणावरून व्यथित झालेले करकरे यांचे माजी सहकारी निवृत्त एसीपी रियाझ देशमुख यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे. रियाझ देशमुख यांनी भोपाळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते साध्वी प्रज्ञासिंह ठाकून यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

भोपाळच्या जागेसाठी १२ मे या दिवशी ५ व्या टप्प्यातील मतदान होत आहे.

कोण आहेत रियाझ देशमुख

रियाझ देशमुख सन २०१६ मध्ये अमरावतीमधून एसीपी या पदावर असताना निवृत्त झाले. गेल्या ३ वर्षांपासून ते अमरावतीत राहात आहेत. त्यांनी ३ दशकाहून अधिक काळ पोलीस दलात सेवा दिली आहे. निवृत्त झाले तेव्हा ते अमरावतीच्या गुन्हे शाखेचे प्रमुख होते. तत्पूर्वी ते अमरावतीतच गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक होते.

निवृत्त झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादमध्ये एक वेब पोर्टल सुरू केले. शिवाय ते पोलीस कर्मचाऱ्यांना कायदेशीर प्रकरणात सल्ला देण्याचे कामही करत असत. १९८६ च्या बॅचचे असलेल्या देशमुख यांनी अकोल्यात ९ वर्षे सेवा दिली. दरम्यानच्या काळात ते करकरेंच्या संपर्कात आले.

१९८८ मध्ये करकरे अकोल्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्या वेळी देशमुख वाशिम पोलीस स्टेशनचे प्रमुख होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात करकरे शहीद झाले. तो पर्यंत देशमुख करकरेंच्या संपर्कात होते.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी जेव्हा भोपाळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच आपण साध्वीविरोधात निवडणूक लढायची, असा निर्णय घेतल्याचे रियाझ देखमुख यांनी सांगितले. मुंबई पोलिसातील सर्वात उत्तम आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची बदनामी होताना आपण पाहू शकत नसल्याचे ते म्हणाले. करकरे यांनी नेहमीच मला चांगले मार्गदर्शन केले आहे. ते नेहमीच माझ्या बाजूने उभे राहिले आहेत, असेही देशमुख म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!