अजिंठालेणी व्हिजीटर सेंटरला लागले कुलूप

0
अभय लोढा | वाकोद,ता. जामनेर : येथून जवळच असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठालेणीच्या सानिध्यात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने उभारलेल्या अजिंठालेणी व्हीजीटर सेंटर चा विद्युतपूरवठा थकीत विज बिलामुळे महावितरणने खंडीत केला आहे.
परीणामी मागील तिन दिवसापासुन या व्हीजीटर सेंटर मध्ये अंधार निर्माण झाला आहे. या व्हिजीटर सेंटरची देखभाल करणार्‍या ठेकेदारानेही व्हीजीटर सेंटर ला कुलूप ठोकुन आपला गाशा गुंढाळला आहे.

जगप्रसिद्ध अजिंठालेणीच्या सानिध्यात फर्दापूर टी.पॉइंट येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करुन अजिंठालेणी व्हिजीटर सेंटर उभारले होते.

या व्हिजीटर सेंटर मध्ये अजिंठालेणीतील लेणी क्रमांक १, २, १६, १७ या लेण्या साकारण्यात आल्या होत्या. त्यातच पर्यटकांच्या सुविधेसाठी या व्हीजीटर सेंटर मध्ये सुसज्ज वाहनतळ, शॉपिंग प्लाझा, चित्रपटगृह, रेस्टॉरंट, सरकता जिना, लिफ्ट , आदी सुविधा उभारण्यात आल्या होत्या.

सर्व सुखसोईनी सुसज्ज अश्या या व्हीजीटर सेंटरचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ मध्ये तत्कालीन केंद्रीय पर्यटन मंत्री डॉ.के चिरंजीवी यांच्या हस्ते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चौव्हान, पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

मात्र उद्घाटनानंतर पर्यटन विकास महामंडळाने या व्हीजीटर सेंटरच्या प्रचार व प्रसाराकडे दुर्लक्ष केले. परीणामी पर्यटकांनी या व्हीजीटर सेंटर कडे पाठ फिरवली.

दरम्यानच्या काळात पर्यटन महामंडळाने या व्हीजीटर सेंटरच्या देखभाल व व्यवस्थापनाची जवाबदारी नांदेड येथील एका खाजगी कंपनीला सोपविली. मात्र तरीही या व्हीजीटर सेंटरकडे पर्यटक फिरकतच नसल्याने उत्पन्ना विना हे व्हिजीटर सेंटर पर्यटन महामंडळासाठी पांढरा हत्ती ठरला होता.

दरम्यान या व्हीजीटर सेंटरचे लाखो रुपयांचे विज बिल काही महीन्यापासुन थकीत असल्याने तिन दिवसा पूर्वी महावितरणने येथील विद्युत पूरवठा खंडीत केला. परीणामी येथील पाणीपुरवठा ही खंडीत होवुन येथील सर्व यंत्रणा ठप्प पडली.

त्यातच दि.२५ जुलै मंगळवार रोजी या व्हिजीटर सेंटर ची देखभाल करणार्‍या कॉंट्रेक्टर ने व्हिजीटर सेंटर ला टाळे ठोकुन चक्क येथुन आपला गाशा गुढाळल्याचे दिसुन आले.

दरम्यान याच पार्श्वभुमीवर अजिंठा व्हिजीटर सेंटर नेमके किती विज बिल थकीत आहे या बाबत माहिती जाणुन घेण्यासाठी पर्यटन महामंडळाचे स्थानिय व्यवस्थापक धनराज शेट्टी यांच्या सोबत संवाद साधला असता त्यांनी या बाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे सांगुन हात झटकले.

तर महावितरणचे कनिष्ठ अभियंता खंबायीतकर यांच्या सोबत संपर्क साधला असता वरीष्ठ अभियंत्यान च्या आदेशानुसार व्हिजीटर सेंटर चा विद्युत पूरवठा खंडीत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र किती थकबाकी आहे या बाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे ही त्यांनी सांगीतले.

पंचेचाळीस कर्मचारी झाले बेरोजगार

अजिंठालेणी व्हिजीटर सेंटर मुळे फर्दापूर येथील व परीसरातील एकूण ४५ तरूण तरुणीना रोजगार प्राप्त झाला होता. मात्र दि.२५ जुलै मंगळवार रोजी येथील कॉंट्रेक्टरने या व्हिजीटर सेंटर ला टाळे ठोकुन आपला गाशागुढाळल्याने येथील पंचेचाळीस कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळल्याचे दिसत आहे.

किती बील माहिती नाही : कनिष्ठ अभियंता श्री. खांबायीतकर

अजिंठालेणी व्हिजीटर सेंटर चा विद्युत पूरवठा खंडीत करण्याचे आदेश आम्हाला वरीष्ठ कार्यालयातुन प्राप्त झाले त्यामुळे आम्ही हा विद्युत पूरवठा खंडीत केला. व्हिजीटर सेंटर चे कीती विजबिल थकीत आहे हे मला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

काहीच कल्पना नाही : व्यवस्थापक पर्यटन महामंडळ श्री. शेट्टी

व्हिजीटर सेंटर बाबतीत सर्व निर्णय औरंगाबाद कार्यालयातुन घेतले जातात त्यामुळे तेथील कीती विजबिल थकीत आहे हे मला माहीत नाही.कॉंट्रेक्टर ने व्हिजीटर सेंटर बंद केले या बाबत हि मला काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*